Wi vs Ind ODI : बुमराह नाही जाणार आयर्लंडला? रोहित शर्माने दिले तंदुरुस्तीबाबत मोठी अपडेट

rohit sharma on jasprit bumrah
rohit sharma on jasprit bumrahsakal
Updated on

Wi vs Ind ODI : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पाठीवर शस्त्रक्रिया करून त्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे पुनर्वसन होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे.

तो भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या उपस्थितीमुळे या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची भारताची शक्यता वाढेल. कर्णधार रोहित शर्माने बुधवारी बुमराहच्या पुनरागमनाची मोठी माहिती दिली आहे.

rohit sharma on jasprit bumrah
WI vs IND ODI: पहिल्या वनडेच्या काही तास आधीच भारताला धक्का! सिराज 'या' कारणामुळे मालिकेतून बाहेर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्माने बुमराहबद्दल सांगितले की, त्याचा (बुमराह) अनुभव खूप महत्त्वाचा आहे. तो सध्या गंभीर दुखापतीतून सावरला असून तो आयर्लंडला जाईल की नाही हे मला माहीत नाही कारण अद्याप संघ जाहीर झालेला नाही. त्याला खेळण्याची संधी मिळाली तर ती चांगली गोष्ट असेल. तो विश्वचषकापूर्वी खेळेल, अशी आम्हाला आशा आहे. जेव्हा एखादा खेळाडू गंभीर दुखापतीतून परततो तेव्हा मॅच फिटनेस खूप महत्त्वाचा असतो.

rohit sharma on jasprit bumrah
खरी फाईटर! शारीरिक हालचालींवर मर्यादा तरी कोल्हापूरच्या रियाने मोडला विक्रम अन् पटकावलं सुवर्ण

रोहित शर्मा पुढे म्हणाला, आम्ही काय नियोजित आहे ते पाहू आणि सर्व काही त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे. आम्ही एनसीएच्या सतत संपर्कात आहोत. खरं तर जसप्रीत बुमराह जवळपास एक वर्षापासून मैदानापासून लांब आहे. तो पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तो श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करणार होता, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी पुन्हा दुखापत झाली त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्टार वेगवान गोलंदाजाचे वैद्यकीय निवेदन जारी केले की, दोन्ही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कृष्णा त्यांच्या पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि गोलंदाजी करत आहेत. दोघेही आता काही सराव सामने खेळतील, जे एनसीए आयोजित करेल. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला त्याच्या बरे होण्याचा विश्वास आहे आणि सराव सामन्यांनंतर त्याच्या फिटनेसचे मूल्यांकन केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.