Ind vs Eng: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! रोहितने दिले खेळण्याचे संकेत

रोहित शर्मा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्मा आयसोलेशनमध्ये आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma
Updated on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पुढील महिन्यात एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा खेळ निश्चित नाही. सराव सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्मा आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयने ट्विट करून रोहितला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. रोहित शर्माने पाचव्या कसोटी सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांना संकेत दिले आहे.

Rohit Sharma
IND VS ENG: इंग्लंडचा संघ जाहीर, कोरोनाबाधित खेळाडूलाही मिळाली जागा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याच्या आधी रोहित शर्माने इंस्टाग्रामवर त्याच्या हॉटेल रूममधून एक सेल्फी शेअर केला आहे, जिथे तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रोहित शर्माची ही पहिली पोस्ट आहे. रोहित खेळला नाही तर पाचव्या कसोटीसाठी कर्णधार कोण होणार?.

Rohit Sharma
T20 विश्वचषकानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर; 6 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

इंग्लंड विरुद्व पाचव्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतने भारताचे नेतृत्व केले होते. निवडकर्त्यांच्या पूर्ण आत्मविश्वासामुळे ऋषभ पंतला ही जबाबदारी मिळू शकते.

गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा एक भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला.

Rohit Sharma
wimbledon 2022: विजयासाठी जोकोविचचा संघर्ष; कोरियन खेळाडूला हरवत दुसऱ्या फेरीत

रोहितने त्या चार कसोटी सामन्यांमध्ये 52.27 च्या सरासरीने 368 धावा केल्या, त्यात ओव्हलवरील शतकाचा समावेश आहे. आता त्या मालिकेतील पाचवा सामना 1 ते 5 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. जर भारताने एजबॅस्टन कसोटी किमान ड्रॉ केली तर ते मालिकेवर कब्जा करतील. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()