भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेआधी (India vs Sri Lanka) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याला विकेटकिपर आणि धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित शर्माने संजू सॅमसनचे तोंड भरून कौतुक केले. श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत ऋषभ पंतला (Rishabh Pant) विश्रांती देण्यात आले आहे. तर संघात इशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसन या दोन विकेट किपरचा समावेश करण्यात आला आहे. आता अंतिम 11 च्या संघात स्थान मिळणार की नाही हा प्रश्न आहे. (Rohit Sharma Big Statement About Sanju Samson)
दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत संजू सॅमसनबाबत बोलताना म्हणाला की, 'सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर तो एक असा खेळाडू आहे ज्यामध्ये गुणवत्ता (Talent) ठासून भरली आहे. त्याला जेव्हा केव्हाही आयपीएलमध्ये (Sanju Samson IPL Batting) बॅटिंग करताना पाहतो त्यावेळी त्याची खेळी सगळ्यांना चंद्रावर घेऊन जाते.'
मात्र रोहित शर्माने संजू सॅमसनबाबत एक इशाराही दिला. तो म्हणाला की, 'त्याच्याकडे यशस्वी होण्यासाठीची सर्व गुणवत्ता आहे. या खेळाची हाच तर विशेष गुण आहे. भरपूर खेळाडूंकडे गुणवत्ता, कसब असते. मात्र तुम्ही ती गुणवत्ता, कसब कसे उपयोगात आणता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मला वाटते की आता आपली गुणवत्ता, कसब कसे जास्तीजास्त वापरायचे हे संजूवरच अवलंबून आहे.'
रोहित पुढे म्हणाला, 'संघ आणि संघ व्यवस्थापन म्हणून आम्हाला त्याच्यात खूप गुणवत्ता, कसब आणि सामना जिंकून देण्याची क्षमता दिसते.' रोहित शर्माने संजू सॅमसनकडे असलेल्या फटक्यांची वैविधतेचे कौतुक केले. त्याला संजू सॅमसनचे बॅकफूटवरील फटके फार आवडतात.
रोहित म्हणाला की, आम्ही त्याचा विचार करत आहोत म्हणूनच तो संघात आहे. आम्ही त्याला आत्मविश्वास देत आहोत. त्या जेव्हा कधी संधी मिळेल त्यावेळी त्याला ही गोष्ट लक्षात येईल. त्याचे बॅक फूटवरचे फटके अप्रतिम असतात. त्याचा पिक अप पूल, कट शॉट, गोलंदाजांच्या डोक्यावरून मारलेले फटके छान असतात. असे फटके खेळणारा खेळाडू आम्हाला ऑस्ट्रेलियात (Sanju Samson Needs In Australia) हवा आहे. सॅमसनमध्ये ती क्षमता आहे. आशा आहे की तो आपल्या गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग करेल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.