Rohit Sharma SA vs IND 1st Test Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्या (दि. 26 डिसेंबर) सेंच्युरियन पार्कवर होत आहे. यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितला उद्याच्या सामन्यात प्लेईंग 11 कशी असेल असा प्रश्न विचारण्यात आला. मोहम्मद शमी दुखापतीमुळे ही कसोटी मालिका खेळत नाहीये. त्याची जागा कोण घेणार हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.
रोहित शर्माला पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संधी देणार की मुकेश कुमारला याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी रोहित म्हणाला की, 'दोन्ही गोलंदाज हे वेगळे आहेत. प्रसिद्ध कृष्णा उंच आणि खेळपट्टीवर चेंडू हिट करणारा गोलंदाज आहे.'
'मुकेश कुमारने गेल्या सहा सात महिन्यापासून प्रभावी कामगिरी केली आहे. या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची हे खेळपट्टी कशी आहे याच्यावर ठरवण्यात येईल. जसप्रीत बुमराह आणि सिराजला संघ त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवतो ते माहिती आहे. आता आम्हाला त्यांच्या जोडीला कोणत्या पद्धतीचा गोलंदाज हवा आहे हे पाहणं महत्वाचं आहे.'
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'आम्हाला स्विंग गोलंदाज हवा आहे की सीम गोलंदाज हवा आहे हे पहावं लागले. आमचा 75 टक्के संघ तयार आहे. उरलेल्या संघाबाबत आज संध्याकाळी संघाच्या बैठकीत ठरवण्यात येईल.'
रोहित शर्माने केएल राहुलबद्दलही वक्तव्य केलं. तो म्हणाला की, आम्ही राहुल द्रविड आणि केएल राहुल यांच्यासोबत बोललो आहे. गेल्यावेळी ते इथे खेळले होते. केएलनं तर शतक देखील ठोकलं होतं. प्रत्येक दिवशी खेळपट्टी कशी बदलते याबबत आम्ही चर्चा केली. आम्ही त्याच्याकडून माहिती गोळा केली आहे. आता आम्ही पुढं काय करायचं याच्यावर विचार करत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.