Rohit Sharma : जिंकायचं असेल आम्हाला एकत्र यायला हवं... रोहित सामना झाल्यावर हे काय म्हणाला?

Rohit Sharma : जिंकायचं असेल आम्हाला एकत्र यायला हवं... रोहित सामना झाल्यावर हे काय म्हणाला?
Updated on

Rohit Sharma : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1 - 0 असा पिछाडीवर पडला आहे. भारताला मालिका वाचवण्यासाठी पुढचा सामना जिंकावाच लागणार आहे.

पहिल्या डावात आफ्रिकेने 163 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताला दुसरा डाव हा 131 धावात संपुष्टात आला. भारताकडून विराट कोहली (76) आणि शुभमन गिल (26) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

दरम्यान, भारताचा दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली. तो सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, 'आम्ही जिंकण्याइतपत चांगलं खेळलोच नाही. आम्ही फलंदाजीतही चांगली कामगिरी केली नाही. गोलंदाजीतही परिस्थितीचा फायदा आम्हाला उठवता आला नाही.' 'आजही आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल आणि सामुहिकरित्या कामगिरी करावी लागले. आम्ही या सामन्यात असं करू शकलो नाही.' रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'आमचे खेळाडू यापूर्वीही इथं येऊन खेळले आहेत. आमच्याकडून काय अपेक्षा होत्या हे आम्हाला माहिती होतं. प्रत्येकाची एक विशिष्ट रणनिती होती. आमच्या फलंदाजाची आफ्रिकेच्या गोलंदाजांनी परीक्षा पाहिली. मात्र आम्हाला परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही. इथं चौकारांना धावा होता. त्यांनी देखील अशीच खेळी केली.

मात्र आम्हाला प्रतिस्पर्धी संघाला ओळखणं गरजेचं होतं. त्यांची ताकद कशात आहे हे ओळखायला हवं होतं. आम्ही दोन्ही डावात फलंदाजी चांगली केली नाही. त्यामुळेच आम्ही पराभवाचे धनी ठरलो.

सामना तीन दिवसात संपल्यावर त्यातून तुम्ही फार काही पॉझिटिव्ह घेऊ शकत नाही. मात्र केएल राहुलने अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची हे दाखवून दिलं आहे.

आमचे बरेच गोलंदाज आपला पहिलाच दक्षिण आफ्रिकी दौरा करत आहेत. त्यामुळे त्यांना फार दोष देण्यात अर्थ नाही. आता आम्हाला पुन्हा एकत्र येऊन पुढच्या कसोटीसाठी तयार रहायला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.