कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या कर्तृत्वाची गोष्ट

बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. यात विराट कोहलीच संघाचे नेतृत्व करेल, पण
Virat-Kohli
Virat-KohliSakal
Updated on

भारतीय टी-20 संघाच्या (Team India) नेतृत्वानंतर आता एकदिवसीय संघाचे (ODI Captaincy) कर्णधारपदही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर देण्यात आले आहे. विराट कोहलीनं (Virat Kohli) टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर मर्यादित षटकांसाठी आणि कसोटीसाठी भारतीय संघाच्या कॅप्टन्सी विभागली जाणार याचे संकेत मिळाले होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून या स्प्लिट कॅप्टन्सीच्या (Split Captaincy) नव्या प्रयोगाला सुरुवात होईल. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. यात विराट कोहलीच संघाचे नेतृत्व करेल, पण वनडेत मात्र रोहितकडे कर्णधारपद असेल.

यापूर्वी रोहित शर्माने 10 वनडे सामन्यात टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबादीर पार पाडली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 10 पैकी 8 सामन्यात विजय नोंदवला आहे. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध धर्मशाला मैदानात रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 7 विकेट्सनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. याशिवाय 2019 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Virat-Kohli
रोहितकडे वनडेचे कर्णधारपद; BCCI चा विराटवर 'भरोसा नाय' का?

विराट कोहलीची कॅप्टन्सी अन् रेकॉर्ड

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 95 वनडे सामने खेळले आहेत. यातील 65 सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली असून 27 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. संघाचे नेतृत्व करत असताना विराट कोहलीनं 72.65 च्या सरासरीने धावा केल्या असून यात 21 शतकांचाही समावेश आहे. विराट कोहली भारतासाठी 254 वनडे सामने खेळला आहे. 2021 मध्ये कोहलीने केवळ तीन वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व केले.

Virat-Kohli
BBL : सीमारेषवर भन्नाट कॅच; सेलिब्रेशनचा तोरा एकदा बघाच (VIDEO)

आयसीसीच्या स्पर्धेत कोहलीची कामगिरी

भारतीय संघाने कोहलीच्या नेतृत्वाखाली निश्चितच दमदार कामगिरी केलीये. पण आयसीसीच्या स्पर्धेत कोहली अपयशी ठरलाय. कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने आयसीसी इव्हेंटमध्ये 18 पैकी 9 सामने जिंकले आहेत. यात वर्ल्ड कपमध्ये 7, आशियाई चषक स्पर्धेत 4 पैकी 2 विजय आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 पैकी 3 सामने जिंकल्याची नोंद आहे. 2017 मध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. तर 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला आउट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.