Rohit Sharma |VIDEO : रोहित म्हणतो, हो वर्ल्डकप जिंकून बरीच वर्ष झाली, तिथं पोहचायला आम्हाला...

Rohit Sharma Says It has been a while since we won the World Cup In BCCI Video
Rohit Sharma Says It has been a while since we won the World Cup In BCCI VideoESAKAL
Updated on

Rohit Sharma BCCI Video : बीसीसीआयने आज (दि. 19) एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा म्हणतो की भारताला वर्ल्डकप जिंकून बराच काळ झाला आहे. रोहितने ते वर्ल्डकप विजेतेपदापर्यंत कशा पद्धतीने पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत हे देखील या व्हिडिओत सांगितले. भारताने शेवटचा वर्ल्डकप 11 वर्षापूर्वी जिंकला होता. ऑस्ट्रेलियात विजेतेपदापर्यंत पोहचण्यासाठी संघाला अनेक दिव्यातून जावे लागणार असल्याची जाणीव रोहित शर्माला आहे.

Rohit Sharma Says It has been a while since we won the World Cup In BCCI Video
MCA Election : मुख्यमंत्र्यांची पवार - शेलार पॅनलसाठी बॅटिंग; म्हणाले काहींची झोप उडाली असेल

रोहित शर्मा बीसीसीआयच्या व्हिडिओत म्हणतो की, 'प्रत्येक खेळाडूने स्वतःला सामन्यादरम्यान शांत ठेवले तर आपल्याला हवा असलेला रिझल्ट मिळू शकतो. वर्ल्डकप जिंकून खूप काळ लोटला. सर्वांच्या डोक्यात वर्ल्डकप जिंकण्याचाच विचार आहे. मात्र आम्हाला माहिती आहे की यासाठी आम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. एका वेळी एक पाऊल पुढे टाकले जाईल. आम्ही एकावेळी एका संघावर लक्ष केंद्रीत करणार आहे. आम्ही आताच सेमी फायनल आणि फायनलचा विचार करत नाहीये.'

रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा पहिलाच वर्ल्डकप असणार आहे. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते. याबाबत रोहित शर्मा म्हणतो, 'संघाचा कर्णधार होणं हा एक सन्मान असतो. कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच वर्ल्डकप आहे त्यामुळे मी खूप उत्साहित आहे. इथे येऊन काहीतरी खास करण्याची ही चांगली संधी आहे.'

Rohit Sharma Says It has been a while since we won the World Cup In BCCI Video
Danish Kaneria : BCCI च्या तुलनेत PCB दुबळे! पाकच्या माजी खेळाडूचा घरचा आहेर

रोहित पुढे म्हणाला, 'प्रत्येकवेळी तुम्ही वर्ल्डकप खेळता त्यावेळी ती एक अद्भुत भावना असते. पर्थमध्ये आम्ही कसून सराव केला. आम्ही मायदेशात दोन मालिका जिंकल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलियातील आव्हान हे वेगळेच असते. इथली परिस्थिती आव्हानात्मक असते. या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठीच आम्ही लवकर ऑस्ट्रेलियात दाखल झालो होतो. वर्ल्डकपची सुरूवात एका मोठ्या सामन्याने होणार आहे. मात्र आम्ही शांत आणि एकाग्र राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैयक्तिकरित्या आम्हाला काय करण्याची गरज आहे याच्यावर आमचा भर असेल. हाच मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा असणार आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()