India vs South Africa : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या घरच्या टी20 मालिकेत प्रथमच पराभूत केले. संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्माने डेथ ओव्हर्समध्ये संघाच्या गोलंदाजांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संघाकडून वारंवार होणाऱ्या चुकाही त्यांनी सांगितल्या. या सामन्यात एकूण 458 धावा झाल्या आणि फक्त सहा विकेट पडल्या.
मालिका जिंकल्यानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजांना आपल्या खेळात सुधारणा करण्यास सांगितले आहे. आफ्रिकेने शेवटच्या दोन षटकांत 46 धावा केल्यामुळे भारतीय संघाला बुमराहची पुन्हा एकदा उणीव जाणवली. सामन्यानंतर रोहित म्हणाला, साहजिकच जसप्रीत बुमराहची दुखापत हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. शेवटची षटके गोलंदाजी करण्यावर भर द्यावा लागेल. गेल्या पाच-सहा सामन्यांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केलेली नाही.
डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणे खूप अवघड असते. इथेच सामन्याचा निर्णय होतो. डेथ ओव्हर्समध्येही आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, ही एक बाजू आहे जिथे आपल्याला नक्कीच आव्हान दिले जाईल. सुर्याचा फॉर्म कायम ठेवण्यासाठी मी त्याला थेट 23 ऑक्टोबरला खेळवण्याचा विचार करत आहे.
गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावांवर रोखले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.