IND vs SL : हिटमॅनच्या उत्तुंग षटकारनं फोडलं नाक; चाहता रुग्णालयात

Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. डे-नाइट टेस्टमध्ये भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma)टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितसह आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर श्रेयस अय्यरनं (shreyas iyer)आपल्या भात्यातील क्षमता दाखवून दिली. त्याचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं असलं तरी त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहल्या डावात 252 धावा केल्या.

रोहित शर्मानं मारलेल्या चेंडूवर चाहता झाला जखमी

रोहित शर्माने पहिल्या डावात एक चौकार आणि एक षटकार खेचला. त्याने विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजी मारलेला फटक्यावर स्टेडियममध्ये बसलेला चाहता दुखापतग्रस्त झालाय. त्याच्या नाकाला इजा झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 22 वर्षीय क्रिकेट चाहता 'डी कार्पोरेट बॉक्स'मध्ये बसला होता. प्राथमिक उपचार आणि एक्सरे काढण्यासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रे काढल्यानंतर संबंधिताच्या नाकाचे हाड फॅक्चर असल्याचे समोर आले. त्याला टाके पडले आहेत. होसमत रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर अजीत बेनेडिक्ट रेयान यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय.

Rohit Sharma
VIDEO : शतकी फिक्र को...भर मैदानात किंग कोहली झाला बुमराह

सामन्यावर टीम इंडियाची पकड

बंगळुरुच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी 16 विकेट्स पडल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील गोलंदाजांनी 4 विकेट घेत श्रीलंकेचा डाव 109 धावांत आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून मयांकच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेटही गमावली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात श्रेयस अय्यरने दमदार खेळी केली. त्याने 98 चेंडूत 92 धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. ऋषभ पंत 39 धावा, हनुमा विहारी 31, विराट कोहली 23 आणि कर्णधार रोहित शर्माने पहिल्या डावात 15 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.