Video : रोहित शर्मा लागला दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीला

Rohit Sharma
Rohit Sharmaesakal
Updated on

मुंबई : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) २६ डिसेंबरपासून सुरु होत आहे. बीसीसीआयने (BCCI) नुकतेच कसोटी संघाची घोषणा देखील केली आहे. याचबरोबर कसोटीत संघाचे उपकर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोसटी संघाच्या नव्या उपकर्णधार रोहित शर्माने आपल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या (India Tour Of South Africa) तयारीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेतून रोहित शर्मा आपल्या पूर्णवेळ कर्णधापदाची सुरुवात देखील करणार आहे. (Rohit Sharma started Practicing for south Africa tour in Mumbai)

Rohit Sharma
"...म्हणून कॅप्टन्सी गमावणं विराट कोहलीला सलत राहिल"

रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तो लाल चेंडूवर (Red Ball Cricket) वेगवान गोलंदाजीवर फलंदाजी करण्याचा सराव करत आहे. या सरावादरम्यान त्याने स्ट्रेट ड्राईव्ह, पूल आणि कव्हर ड्राईव्ह या फटक्यांचा सराव करताना दिसतो. याचबरोबर तो विकेट बाहेरचा चेंडू सोडण्याचाही सराव करताना दिसतो.

Rohit Sharma
शास्त्रींना आठवल्या चुका; थ्रीडी मॅनवरही झाला होता अन्याय

रोहित शर्मा (Rohit Sharma) गेल्या काही काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत होता. आयपीएलचा पहिला भाग, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, इंग्लंडमधील कसोटी मालिका, आपीएलचा उर्वरित हंगाम आणि त्यानंतर टी २० वर्ल्डकप या सर्व स्पर्धा तो ८ महिन्यादरम्यान खेळला आहे.

Rohit Sharma
ऑलिम्पिक चॅम्पियन विरुद्ध पंगा; ती कोर्टात पोहचली, अन् जिंकलीही

त्यामुळेच बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्मा आणि काही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विश्रांती दिली होती. भारताने ही कसोटी मालिका १ - ० ने जिंकली. आता रोहित शर्मा पुन्हा मैदानावर येण्यास सज्ज होत आहे. रोहितच्या फलंदाजीचा जलवा आता २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सेंच्युरियन पार्कवरील (Centurion Park) पहिल्या कसोटीत पहावयास मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.