India Vs Afghanistan T20I Match News : टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. पहिले दोन सामने एकतर्फी झाले पण तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने कडवी झुंज दिली. सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोनदा सुपर ओव्हर्स घ्याव्या लागल्या. शेवटी टीम इंडियाचाच येथे विजय झाला.
या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता. त्याच्या आनंदाचे एक कारण म्हणजे या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते. प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने एवढी मोठी खेळी केली होती.आधीच्या दोन सामन्यांमध्ये तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा स्थितीत या सामन्यातील उत्कृष्ट खेळी आणि या विजयानंतर त्याने टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे आश्वासन दिले.
सामन्यानंतर, जिओ सिनेमावरील संभाषणात रोहित शर्माने जूनमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपबाबत सांगितले की, तो आणि त्याची टीम पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करतील. यासोबतच रोहित शर्माने सामना दोनदा सुपर ओव्हर गाठून पुन्हा पुन्हा फलंदाजीला येण्याबाबत मजेशीर विधान केले.
तो म्हणाला की, कसोटी क्रिकेटमध्येही तीन वेळा फलंदाजीला यावे लागत नाही. याआधी, आयपीएलमध्ये एकदा असे घडले होते जेव्हा मी एकाच टी-20मध्ये तीनदा फलंदाजीसाठी आलो होतो.
रोहितने येथे त्याच्या आणि रिंकू सिंगच्या भागीदारीबद्दलही सविस्तरपणे सांगितले. रोहित म्हणाला, 'त्यावेळी भागीदारीची नितांत गरज होती. 22 धावांत 4 विकेट पडल्या होत्या. दबावाखाली फलंदाजी करण्याची ही चांगली संधी होती. आम्हाला फक्त जास्त वेळ फलंदाजी करायची होती. रिंकूने गेल्या काही मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो काय करू शकतो हे त्याने सांगितले आहे. आणि तो त्याच्या गेम प्लॅनबद्दल स्पष्ट आहे. जेव्हा-जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने आपला प्रभाव सोडला आहे. त्याने आयपीएलमध्ये जे काही केले, ते इथेही सातत्याने करत आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा (121) आणि रिंकू सिंग (69) यांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 212 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही निर्धारित षटकांत 212 धावा केल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये आणला. यानंतर सुपर ओव्हरही बरोबरीत राहिली. इथे दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळावी लागली, जिथे टीम इंडियाचा विजय झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.