Rohit Sharma On Pitch : अशा खेळपट्टीवर खेळायला अडचण नाही फक्त भारतात आल्यावर... रोहित शर्माचं कडक उत्तर

Rohit Sharma On Pitch
Rohit Sharma On Pitchesakal
Updated on

Rohit Sharma On Pitch : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. केप टाऊनच्या खेळपट्टीबाबत ना विदेशी मीडिया ना भारतात फार काही बोलण्यात आलं. मात्र या खेळपट्टीवर पहिल्या दिवशीच 23 विकेट्स पडल्या होत्या.

या कसोटीत अवघ्या 108 षटकांमध्ये 33 विकेट्स पडल्या अन् 642 धावा झाल्या आहेत. दरम्यान, सामना झाल्यानंतर रोहितने खेळपट्टीबाबत वक्तव्य केलं. त्याने आपल्या वक्तव्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांना चांगलाच टोला लगावला.

Rohit Sharma On Pitch
Rohit Sharma : इतिहास रचला... मालिका बरोबरीत सोडवली तरी रोहित एका गोष्टीवर नाराज

रोहित म्हणाला, 'मला अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळायला काहीच अडचण नाही. फक्त सर्वांनी भारतात आल्यावर आपलं तोंड बंद ठेवायला हवं. त्यावेळी तुम्ही भारतीय खेळपट्ट्यांबाबत तक्रार करू नये. तुम्ही इथे स्वतःला आव्हान देता. ज्यावेळी लोकं भारतात येतात त्यावेळी त्यांना तिथली परिस्थिती आव्हानात्मक असते.'

Rohit Sharma On Pitch
Rohit Sharma : धोनीलाही जमलं नाही ते रोहितनं दक्षिण आफ्रिकेत करून दाखवलं मात्र...

वनडे वर्ल्डकपची फायनल अहमदाबादमध्ये झाली होती. ती खेळपट्टी संथ आणि चेंडू कमी उसळी घेणारी होती. त्या खेळपट्टीला आयसीसीने सुमार दर्जा दिला होता. भारतातील प्रत्येक कसोटी सामन्यात खेळपट्टीची जोरदार चर्चा होत असते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही संघ भारतात कसोटीत फिरकीसमोर ढेपाळतात.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.