Rohit Sharma : कर्णधारानेच टीम इंडियाला दिलं टेन्शन... रोहितचे दक्षिण आफ्रिकेतील आकडे काय सांगतात?

रोहित शर्माची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी कशी आहे?
rohit sharma
rohit sharma esakal
Updated on

Rohit Sharma : भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी 20 मालिका बरोबरीत तर वनडे मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताने दुसऱ्यांदाच दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकली असून आता कसोटी मालिकेतील विजयाचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित सेनेने कंबर कसली आहे.

भारताचा पहिला कसोटी सामना हा सेंच्युरियनवर 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघाने सराव सत्रात चांगलाच घाम गाळला असून जाणकारांच्या मते या भारतीय संघाकडे दक्षिण आफ्रिकेतील आपला पहिला कसोटी मालिका विजय नोंदवण्याची चांगली संधी आहे.

rohit sharma
SA vs IND 1st Test Playing 11 : रोहितला एका वरिष्ठ खेळाडूचं मन दुखवावं लागणार; प्लेईंग 11 निवडताना डोकेदुखी वाढणार

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा या दौऱ्यावर एक महत्वाचा खेळाडू असणार आहे. कॅप्टन्सीसोबतच रोहित शर्माला त्याच्या बॅटने देखील कमाल दाखवावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत संघाला चांगली सुरूवात करून देणे महत्वाचं आहे.

कसं आहे रोहित शर्माचं दक्षिण आफ्रिकेतील रेकॉर्ड?

भारताचा कर्णधार रोहित शर्माने वनडे वर्ल्डकपमध्ये सेल्फलेस खेळ तर सर्वांची मनं जिंकली होती. तो संघाला आक्रमक सुरूवात करून देण्यासाठी आग्रही होता. मात्र दक्षिण आफ्रिकेतील रोहित शर्माचे आकडे फारसे उत्साहवर्धक नाहीत.

हिटमॅनची दक्षिण आफ्रिकेतील कसोटी क्रिकेटमधील कामगिरी निराशाजनक आहे. त्याने 4 कसोटी सामन्यात 15.37 च्या सरासरीने 123 धावा केल्या आङेत. त्याला दक्षिण आफ्रिकेत शतक सोडा अर्धशतकही ठोकलेलं नाही. त्याचा दक्षिण आफ्रिकेतील सर्वोच्च स्कोअर हा 47 आहे.

रोहितची एकूण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटीतील कामगिरी पाहिली तर ती चांगली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 42.37 च्या सरासरीने 678 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचा देखील समावेश आहे. त्याची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 212 धावांची सर्वोच्च खेळी आहे.

rohit sharma
Alyssa Healy : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं सामना गमावला मात्र कर्णधारानं जिंकलं मन; एलिसा हेली होतेय ट्रेंड

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, केएल राहुल, केएस भरत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.