Rohit Sharma : वर्ल्डकप मोहीम सुरू करण्यापूर्वी रोहित शर्मा देवाच्या दारी! पत्नी अन् मुलीसोबत प्रसिद्ध मंदिराला दिली भेट

Rohit Sharma Temple Visit
Rohit Sharma Temple Visitesakal
Updated on

Rohit Sharma Temple Visit : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी भारताचा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या विश्रांतीचा फायदा घेत रोहित शर्मा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घावलत आहे. आता रोहित शर्मा थेट आशिया कपसाठीच भारतीय संघात परतणार आहे. (Rohit Sharma Tirupati Balaji Temple Visit)

दरम्यान, भारतीय कर्णधाराने पत्नी रितीका आणि मुलगी सायरासोबत प्रसिद्ध बालाजी मंदिराला भेट दिली. रोहितने बालाजीचे दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील अनेक खेळाडू हे देवदर्शन करताना दिसत आहेत. यात विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव यांनी अनेक मंदिरांना भेट दिल्याचे फोटो आपण पाहिले आहेत. (ICC ODI World Cup 2023)

Rohit Sharma Temple Visit
Cristiano Ronaldo: रोनाल्डोने संपवला ट्रॉफीचा दुष्काळ! अल नासरने पहिल्यांदाच पटकावले अरब क्लब चॅम्पियन्स कपचे विजेतेपद

भारत 30 ऑगस्टसासून आशिया कप खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्डकपचे सराव सामने सुरू होतील. आशिया कपमध्ये देखील भारतीय संघ वर्ल्डकपच्या मोहीमेअंतर्गतच आपल्या संघाची बांधणी आणि रणनितीची आखणी करेल. यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली तसेच काही महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

या विश्रांतीच्या काळात रोहित शर्माने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत तिरूपती बालाजीचे दर्शन घेतले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी रोहित शर्माला त्याच्या याहत्यांनी घेरल्याचे दिसून आले. (Asia Cup 2023)

Rohit Sharma Temple Visit
WI vs IND : 'अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना', विजयानंतर KL राहुल अन् इशान किशनवर मीम्स व्हायरल

रोहित शर्मा आपल्या फिटनेसवर करतोय काम

रोहित शर्माने वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू केली आहे. ब्रेकमध्ये देखील तो आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देतोय. सोशल मीडियावर रोहित शर्माचा जीममधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा वेट ट्रेनिंग करताना दिसतोय.

यावरून रोहित शर्मा आशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या वर्ल्डकपबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. आशिया कपमध्ये भारतीय संघ आशियातील प्रमुख संघांशी दोन हात करून आपली वर्ल्डकपची तयारी करून घेण्याचा प्रयत्न करेल. आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. ही 14 ऑक्टोबरची रंगीत तालीम असणार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()