Rohit Sharma Video : रोहित शर्माने फॅनला केलं लग्नासाठी प्रपोज; व्हायरल व्हिडिओची होतेय चर्चा

Rohit Sharma Video Viral  proposed man at airport video viral ind vs aus 2nd odi
Rohit Sharma Video Viral proposed man at airport video viral ind vs aus 2nd odi
Updated on

Rohit Sharma Video Viral : ऑस्ट्रेलियाने मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. रविवारी विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांतच लक्ष्य गाठले. या दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

भारताचा दारुण पराभव झाला

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून पराभव केला. चेंडूंच्या बाबतीत भारताचा वनडे फॉरमॅटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

रोहित शर्मा देखील या सामन्यासाठी टीम इंडियात सामिल झाला होता, ते वैयक्तिक कारणांमुळे पहिला वनडे खेळू शकला नव्हता. भारतीय संघ 117 धावा करून बाद झाला, त्यानंतर मिचेल मार्श (66*) आणि ट्रॅव्हिस हेड (51*) यांनी मिळून 11 षटकांत संघाला विजय मिळवून दिला.

Rohit Sharma Video Viral  proposed man at airport video viral ind vs aus 2nd odi
IND vs AUS : 'बाबा रे दोन गोल्डन डक! तूझ्याकडून हे अपेक्षित नव्हती!', सूर्या T20 मध्ये हिट पण ODI फ्लॉप

अन् रोहितने चाहत्याला केलं प्रपोज

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित विमानतळावर त्याच्या एका चाहत्याला लग्नासाठी प्रपोज करत आहे. कर्णधार रोहित शर्मा विमानतळावरून बाहेर पडत होता, त्याचवेळी एक चाहता त्याला भेटण्यासाठी पोहोचला. रोहितच्या हातात गुलाबाचं फूल आहे, तो त्याच फॅनला भेट देतो आणि म्हणतो- तू माझ्याशी लग्न करशील. तो चाहताही हसायला लागतो.

Rohit Sharma Video Viral  proposed man at airport video viral ind vs aus 2nd odi
IPL 2023 : स्टार स्पोर्ट्सने दिग्गज कमेंटेटर आकाश चोप्राची केली हकालपट्टी

स्टार्कसमोर भारतीय संघाचं लोटांगण

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विशाखापट्टणममध्ये आपल्या गोलंदाजीने कहर केला. त्याने 8 षटकात 53 धावा देत 5 बळी घेतले. त्याचवेळी शॉन अॅबॉटने 3 विकेट्स घेतल्या. नॅथन एलिसने 2 बळी घेतले. त्यानंतर मार्शने 36 चेंडूत नाबाद 66 धावा करत भारताच्या उरल्या सुरल्या सर्व आशा संपवल्या. या विजयानंतर स्टार्कची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.