Team India Captain for T20 World Cup : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप भारताचा कर्णधार कोण असेल हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कप 2022 पासून भारतासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या देखील सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
2023 च्या वर्ल्ड कपदरम्यान हार्दिक पांड्याला घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधारपदाची संधी मिळाली, परंतु दुर्दैवाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील शेवटच्या टी-20 दरम्यान तो जखमी झाला.
सध्या कर्णधारपदाच्या शर्यतीत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांची नावे आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी सांगितले आहे की, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा पैकी कोण टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताची धुरा सांभाळू शकतो.
आकाशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'कदाचित हार्दिक टी-20 वर्ल्ड कपमध्ये कर्णधार नसणार कारण त्याला फिटनेसची समस्या आहे. तो अफगाणिस्तान मालिका आणि कसोटी मालिकाही खेळणार नाहीस. आता तो थेट आयपीएल खेळणार आहे. ही गोष्ट त्याच्या विरोधात जाते. त्यामुळे मला वाटते की फक्त रोहितच टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळेल. आणि 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो भारताचा कर्णधार असेल.
यावर्षी, टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आयपीएलनंतर म्हणजेच 1 जूनपासून सुरू होईल. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जाणार आहे. या वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाकडे फक्त एक टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका शिल्लक आहे.
ही मालिका याच महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळली जाणार आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा टी-20 संघ आज (7 जानेवारी) जाहीर केला जाऊ शकतो. या मालिकेतून रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.