WTC Final : टीम इंडियाला भिडण्यापूर्वी टेलरचा 'ट्रेलर'

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात 85 धावांची आघाडी घेतलीये.
 ross taylor
ross taylortwitter
Updated on

England vs New Zealand, 2nd Test: इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात रॉस टेलरने (Ross Taylor) 80 धावांची धमाकेदार खेळी केली. टेलरने आपल्या इनिंगमध्ये 11 खणखणीत चौकार खेचले. त्याने कसोटी कारकिर्दीतील 35 वे अर्धशतक झळकावले. रॉस टेलरने 139 चेंडूचा सामना करताना 80 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने खास विक्रम आपल्या नावे केला. (ross-taylor-become-3rd-batsman-with-most-50-scores-in-tests-for-new-zealand-hindi)

न्यूझीलंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा 50 + धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने 54 वेळा अशी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटर आणि कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने यांनी 55 वेळा कसोटी सामन्यात 50 + धावा केल्यात. न्यूझीलंडकडून सर्वाधिक 50 + धावा करण्याचा विक्रम हा न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या नावे आहे. विल्यमसनने 56 वेळा अशी कामगिरी केलीये. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात टेलरशिवाय डेवोन कॉन्वे 80 विल यंग यांनी 82 धावांची खेळी केली.

 ross taylor
VIDEO : दोन षटकार खाल्यावर पाक गोलंदाजाने रसेलला केले जखमी

इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 303 धावा केल्या होत्या. डेवोन कॉन्वे, रॉस टेलर आणि विल यंग या तिकडीच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने सामन्यात मोजक्या धावांची आघाडी मिळवली आहे. पहिला सामना अनिर्णित झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल लागणार का? हे पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी ट्रेलरने फॉर्ममध्ये असल्याचा ट्रेलर दाखवला असून तो भारताविरुद्ध कशी कामगिरी करणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

न्यूझीलंडचा पहिला डाव 388 धावांत आटोपला असून त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 85 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मार्क वूड आणि ओली स्टोन यांनी प्रत्येकी 2-2 तर जेम्स अँडरसन आणि डेनियल लॉरेन्स यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.