Ross Taylor : राजस्थान रॉयल्सच्या मालकाने कानशिलात लगावल्या; टेलरचा खळबळजनक दावा

Ross Taylor Claim Rajasthan Royals One Team Owner slapped Him On Face Autobiography Black And White
Ross Taylor Claim Rajasthan Royals One Team Owner slapped Him On Face Autobiography Black And White esakal
Updated on

Ross Taylor Black & White : रॉस टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर Ross Taylor : Black & White हे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्रात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केलेत. न्यूझीलंड संघात वर्णद्वेशाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केल्यानंतर आता त्याने आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) एका संघ मालकाने (Team Owner) मला कानशिलात (Slapped) लगावल्याचा दावा केला आहे. पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना रॉस टेलर शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर संघ मालकाने मला कानशिलात लगावल्याचा दावा टेलरने आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

Ross Taylor Claim Rajasthan Royals One Team Owner slapped Him On Face Autobiography Black And White
ZIM vs IND : भारतीय संघाने 'सिकंदर'पासून राहिले पाहिजे सावध

न्यूझीलंच्या stuff.co.nz या वेबसाईटने रॉस टेलरच्या आत्मचरित्रातील एक भाग प्रसिद्ध केल आहे. या प्रसिद्ध केलेल्या भागातील म्हटले आहे की, 'राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्जविरूद्ध मोहालीत खेळत होते. राजस्थानला 195 धावांचे आव्हान पार करायचे होते. मी शुन्यावर पायचीत बाद झालो. आम्हाला या धावसंख्येच्या जवळपास देखील जाता आले नाही. सामना झाल्यानंतर संघ, सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापन हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावरील बारमध्ये गेलो होते. लिझ हर्ले आणि वॉर्न देखील तेथे होते.'

Ross Taylor Claim Rajasthan Royals One Team Owner slapped Him On Face Autobiography Black And White
MS Dhoni Mentor : मेटॉर होणं पडणार महागात; बीसीसीआयची धोनीला तंबी

टेलर पुढे म्हणतो की, 'राजस्थान रॉयल्सचा एक संघमालक मला म्हणाला की, रॉस आम्ही तुला शुन्यावर बाद होण्यासाठी लाखो डॉलर्स देत नाही. त्यानंतर त्याने मला तीन चार वेळा कानशिलात लगावली. तो त्यावेळी हसत होता आणि त्याने मारलेल्या कनशिलात फार हुळवारपणे मारल्या होत्या. त्यामुळे मी त्या खेळकर वृत्तीने मारल्या होत्या की नाही याबाबत साशंक आहे. मात्र माझ्या खेळाच्या व्यावसायिक कारकिर्दित असा प्रसंग घडेल असा मी विचार देखील केला नव्हता.'

रॉस टेलर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून 2008 ते 2010 पर्यंत खेळला होता. त्यानंतर तो 2011 मध्ये राजस्थान रॉयल्स संघात गेला. याचबरोबर त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि पुणे वॉरियर्सचे देखील प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.