Gautam Gambhir : लखनौ सुपर जायंटच्या RPSG Group ने गंभीरला दिली 'ग्लोबल' जबाबदारी

Gautam Gambhir role Extended as global mentor In RPSG Group
Gautam Gambhir role Extended as global mentor In RPSG Groupesakal
Updated on

Gautam Gambhir Global Mentor RPSG Group : लखनौ सुपर जायंटची फ्रेंचायजी RPSG Group ने लखनौचा मेंटॉर गौतम गंभीरवर आता ग्लोबल जबाबदारी टाकली आहे. गौतम गंभीर आर RPSG Group चा ग्लोबल मेंटॉर असणार आहे. याबाबतची घोषणा आज (दि. 07) करण्यात आली. सध्या गौतम गंभीर इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ सुपर जायंटला मार्गदर्शन करत आहे. आता त्याच्यावर RPSG Group ची दक्षिण आफ्रिकेतील टी 20 टीम डर्बन सुपर जायंट्स याची देखील जबाबदारी असणार आहे.

Gautam Gambhir role Extended as global mentor In RPSG Group
INDW vs PAKW : थायलंडकडून हरलेल्या पाकिस्तानने भारताचा केला पराभव

भारताचा माजी सलामीवीर हा एक हुशार क्रिकेटपूट म्हणून ओळखला जातो. तो भारताने जिंकलेल्या पहिल्या टी 20 वर्ल्डकप संघाचा एक भाग होता. याचबरोबर 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या वनडे वर्ल्डकप विजयात देखील त्याचे मोठे योगदान होते.

गंभीरला ग्लोबल जबाबदारी दिल्यानंतर गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'माझ्या विचारधारेत सांघिक खेळात पद फार मोठी भुमिका बजावत नाही. ते संघ जिंकावा यासाठी मदत करण्यासाठी तेथे असतात. सुपर जायंट्सचा ग्लोबल मेंटॉर म्हणून मी माझी जबाबदारी चोख पार पाडण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्या जिंकण्याच्या तीव्र इच्छेला आणि भावनेला आता आंतरराष्ट्रीय पंख मिळाले आहेत.'

Gautam Gambhir role Extended as global mentor In RPSG Group
Sourav Ganguly : गांगुली अध्यक्षपद सोडणार; वर्ल्डकप विजेत्या संघातील माजी खेळाडू रेसमध्ये

गंभीर पुढे म्हणाला की, 'सुपर जायंट कुटुंबाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवताना पाहणे मला आवडेल. माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सुपर जायंट कुंटुंबाचा आभारी आहे. असं वाटतंय आता अजून काही रात्री जागण होणार आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()