Shubman Gill : गिलच्या द्विशतकाचे ज्युनिअर NTR सोबत मोठं कनेक्शन; पोस्टमधून खुलासा
शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. धडाकेबाज फलंदाजी करताना गिलने द्विशतक झळकावले. गिलची ही कामगिरी पाहता क्रिकेट जगतात कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. अशातच त्याच्या या द्विशतकाचे दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरसोबत कनेक्शन असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (RRR star Jr NTR turns lucky charm for Shubman Gill fans IND vs NZ )
काल झालेल्या सामन्यात १४९ चेंडूंत १९ चौकार व ९ षटकारांसह २०८ धावांची खेळी केली आणि भारताची धावसंख्या ३४९ धावांपर्यंत पोहोचवली. २३व्या वर्षी असा पराक्रम करताना द्विशतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला.
IND vs NZ: गिलने वरचढ ठरणाऱ्या किवी गोलंदाजांविरुद्ध वापरली खास ट्रिक मॅच संपल्यावर म्हणाला...
त्याच्या या धडाकेबाज खेळीनंतर चाहते भलतेच फिदा झाले आहे. ज्युनिअर एनटीआर त्याच्यासाठी लकी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
सामन्याच्या काही दिवस आधी शुभमनने ज्युनिअर एनटीआरसोबतचा एक फोटो शेअर करत त्याच्या आरआरआर गोल्डन ग्लोब मिळाल्याबद्दल त्याचं आणि त्याच्या टीमचं अभिनंदन केलं होतं.
तो सध्या फोटो व्हायरल होत आहे. त्यांनतर या पोस्टवर कमेंट करत ज्युनिअर एनटीआरने शुभमनचे आभार मानत त्याला भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
IND vs NZ: नटखट ईशान किशन! घेणार होता पांड्याचा बदला मात्र...
गिलच्या द्विशतकानंतर ही दोघांच्या भेटीची पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. एनटीआरच्या भेटीनंतर गिलचे आयुष्य बदलले असही नेटकरी म्हणत आहेत.
शुभमन गिलने सांगितले द्विशतकीय खेळीमागील रहस्य
त्याला द्विशतक होईल अशी अपेक्षा नव्हती. पण ४७ व्या षटकात दोन षटकार मारल्यानंतर त्याला आत्मविश्वास आला की हे शक्य आहे. जे चेंडू माझ्याकडे येत होते तेच मी खेळत होतो.
सामना सुरु होण्याआधी बाहेर जाऊन मला काय करायचे आहे हे दाखवण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो. गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्याची आवश्यकता असते, मी तेच करत होतो. त्यामुळे गोलंदाजांवर दडपण आले, असं शुभमन गिलने सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.