शमीने 'पंजा' मारला तर बसेल कुंबळे, श्रीनाथच्या पंक्तीत

Mohammed Shami
Mohammed Shami esakal
Updated on

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (RSA vs IND 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना केपटाऊन येथे आजपासून ( दि. ११) सुरु होत आहे. भारतासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa National Cricket Team) दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे भारताला (India Cricket Team) दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी तिसरा कसोटी सामना जिंकणे आवश्यक आहे. याचबरोबर या मालिकेत चांगला मारा करणाऱ्या मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला देखील एक खास कामगिरी करण्याची चांगली संधी तिसऱ्या कसोटीत आहे. (Mohammed Shami Latest News)

Mohammed Shami
द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेटमधले 'मनमोहन सिंग'

जर मोहम्मद शमीने तिसऱ्या कसोटीत भेदक मारा केला आणि दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद करण्याची किमया केली तर तो भारताचे महान गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांच्या पक्तीत जाऊन बसेल. भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५० पेक्षा जास्त विकेट घेणारे चारच गोलंदाज आहेत. यात अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि रविचंद्र अश्विन यांचा समावेश आहे.

अनिल कुंबळे ने १९२ ते २००८ दरम्यान आफ्रिकेविरुद्ध २१ सामन्यात ३१.७९ च्या सरासरीने ८४ विकेट घेतल्या आहेत. तर जवागल श्रीनाथने १९९२ ते २००१ दरम्यान, १३ सामन्यात २४.४८ च्या सरासरीने ६४ विकेट्स, हरभजन सिंगने २००१ ते २०११ दरम्यान ११ सामन्यात २८.४० च्या सरासरीने ६० तर आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) २०१३ ते २०२२ दरम्यान १२ सामन्यात २०.७६ च्या सरासरीने ५६ विकेट्स घेतल्या आहेत.

Mohammed Shami
'तिसरी कसोटी म्हणजे १५ वर्षातील सर्वात मोठा सामना'

जर भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या ५ फलंदाजांना बाद केले तर तो आफ्रिकेविरुद्ध ५० पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जाऊन बसेल. अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज ठरेल. शमीने २०१३ पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० सामन्यात २०.५५ सरासरीने ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.