Rubina Francis in Paralympic: जन्मत:च पायात दिव्यांगत्व; पण परिस्थितीला हरवत मॅकेनिक वडिलांच्या लेकीची पॅरिसमध्ये पदकाची कमाई

Paris Paralympic 2024: रुबिना फ्रान्सिस हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदक जिंकले आहे.
Rubina Francis | Paris Paralympic 2024
Rubina Francis | Paris Paralympic 2024Sakal
Updated on

Rubina Francis Story: भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस हिने कमालीची एकाग्रता दाखवत शानदार खेळ केला आणि पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्राँझपदक जिंकले. पात्रता फेरीत सातवा क्रमांक मिळवत तिने अंतिम फेरी गाठली होती. स्वरूप उन्हाळकरला मात्र आपला ठसा उमटवता आला नाही.

२५ वर्षीय रुबिना पात्रता फेरीत बहुतांश वेळी पहिल्या आठ स्पर्धकांत नव्हती; परंतु अंतिम क्षणी आपला खेळ उंचावत तिने अंतिम फेरी गाठत पदकाची आशा कायम ठेवली. अंतिम फेरी गाठणाऱ्या आठ स्पर्धकांत रुबिना सातवी आली. तीन वर्षांपूर्वी झालेल्या पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेतही तिने अंतिम फेरी गाठली होती; मात्र त्यावेळेस तिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

अंतिम सामन्यात रुबिनाने ९७.६ गुणांची कमाई केली. सुवर्णपदक जिंकणाऱ्या तुर्कस्तानच्या आयसेल ओझगान हिने सर्वाधिक ९९.५ गुणांची कमाई केली तर रौप्यपदक मिळवणाऱ्या इराणच्या सारेह जावनमारदी हिला ९८.३ गुण मिळाले.

Rubina Francis | Paris Paralympic 2024
Paris Paralympic 2024: कोणाचा अपघात, तर कोणाला पोलिओ... पण परिस्थितीला हरवत दुसऱ्या दिवशी पदक जिंकणाऱ्या चौघांची कहाणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.