Rudi Koertzen : माजी ICC अंपायर रूडी कर्टझन यांचे कार अपघातात निधन

Rudi Koertzen ICC Former Umpire Died In Car Accident
Rudi Koertzen ICC Former Umpire Died In Car Accidentesakal
Updated on

नवी दिल्ली : आयसीसीचे माजी अंपायर रूडी कर्टझन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचे माजी अंपायर यांचे अपघातात निधन झाले आहे. रूडी यांच्याबरोबरच इतर तीन जणांची रस्ते अपघातात समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही घटना मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या रिडरडेल भागात घडली. रूडी हे एक आयसीसीचे सर्वोकृष्ट अंपायर (Umpire) पैकी एक होते. त्यांना 331 सामन्यांचा अंपयरिंगचा अनुभव होता. (Rudi Koertzen ICC Former Umpire Died In Car Accident)

Rudi Koertzen ICC Former Umpire Died In Car Accident
Kieron Pollard : पोलार्डचे मोठे रेकॉर्ड; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

रूडी यांनी 1992 मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथील दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापासून आपल्या अंपयरिंग कारकिर्दिला सुरूवात केली होती. त्याने रेकॉर्ड 209 वनडे आंतरराष्ट्रीय 14 टी 20 सामन्यात अंपायरिंग केली आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील 1999 मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या सामन्यात त्यांनी स्मरणीय अंपायरिंग केली होती.

Rudi Koertzen ICC Former Umpire Died In Car Accident
Dinesh Karthik : 'दिनेश कार्तिकला संघात जागा नाही, त्याने माझ्या शेजारी बसावं'

त्यांनी 2003 आणि 2007 च्या वर्ल्डकप फायलनमध्ये देखील त्यांनी थर्ड अंपायरची भुमिका बजावली होती. 2010 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमधून निवृत्ती घेतली. गेल्या वर्षभरात क्रिकेट जगताला अचानक निधनांच्या वृत्ताने अनेक धक्के बसले आहेत. शेन वॉर्न याचा हॉटेलमध्ये झालेला मृत्यू तसेच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यु सायमंड्स याचा देखील कार अपघातात मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.