रशियन खेळाडूचं संतापजनक कृत्य, युक्रेनियन प्रतिस्पर्ध्यासमोर छातीवर लावलं 'Z'

russian gymnast shows Pro-Invasion Symbol on his shirt next to ukrainian winner causes outrage
russian gymnast shows Pro-Invasion Symbol on his shirt next to ukrainian winner causes outrage
Updated on

सध्या सगळ्या जगाचे लक्ष रशिय-युक्रेन युध्दाकडे लागले आहे, सगळ्या जगभरातून या युध्दाबाबत निषेध व्यक्त होत आहे, तर अनेक राष्ट्रांनी रशियावर निर्बंध देखील लादले आहेत. तसेच रशियामध्ये देखील अनेक सामान्य नागरिक तसेत प्रसिध्द खेळाडूंनी या युध्दाबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मात्र एक क्रीडाविश्वाला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे.

शनिवारी कतारमध्ये झालेल्या एका स्पर्धेच्या फायनलनंतर व्यासपीठावर युक्रेनियन खेळाडूच्या बाजूला उभे राहाताना रशियन जिम्नॅस्टने त्याच्या कपड्यांवर युध्दाचे समर्थन करणारे चिन्ह लावल्याचा प्रकार घडला. या धक्कादायक प्रकारानंतर त्या रशियन खेळाडूची चौकशी केली जाणार असून त्या खेळाडूवर जगभरातून जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स फेडरेशन (FIG) ने सांगितले की, त्यांनी जिम्नॅस्टिक्स एथिक्स फाऊंडेशनलाइव्हान कुलियाक (Ivan Kuliak) याने दोहा येथील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड कप स्पर्धेत (Artistic Gymnastics World Cup competition) अक्षेपार्ह वर्तन केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे असे वृत्त द गार्डियनने दिले आहे.

पॅरलल बार या क्रीडाप्रकाराच्या फायनलमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, कुलियाकने त्याच्या छातीवर "Z" अक्षर चिकटवले आणि तो युक्रेनच्या सुवर्णपदक विजेत्या इलिया कोव्हटुन( Illia Kovtun) च्या बाजूला व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. व्यासपीठावर उभे राहिल्यावर रशियाच्या इव्हान कुलियाकच्या कपड्यांवर ते झेड (Z) अक्षर दिसत होतं.

russian gymnast shows Pro-Invasion Symbol on his shirt next to ukrainian winner causes outrage
'पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?', पाश्चिमात्य देशांवर इम्रान खान भडकले!

‘Z’ अक्षराचा अर्थ काय?

युद्धाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘Z’ अक्षर असलेले कपडे आणि बॅज घातलेले याआधी दिसलं आहे. Z हे अक्षर रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या समर्थनाचे चिन्ह बनले आहे. रशियाच्या लष्करी वाहनांवर हे चिन्ह वापरले जात आहे. रशियातील लोक युद्धाला समर्थन देण्यासाठी हे चिन्ह वापरत आहेत. रशियाचे राजकारणी सामान्य नागरिक देखील हे चिन्ह मिरवत आहेत.

russian gymnast shows Pro-Invasion Symbol on his shirt next to ukrainian winner causes outrage
निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला

दरम्यान हा विश्वचषक ही रशियन आणि बेलारशियन खेळाडूंसाठी FIG-शासित स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम संधी होती. सोमवारपासून, त्या देशांतील सर्व खेळाडू, अधिकारी आणि परिक्षकांवर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणा FIG ने शुक्रवारी केली आहे .

युक्रेनवर रशियन आक्रमण झाल्यापासून अनेक खेळांनी बेलारशियन आणि रशियन खेळाडूंशी संबंध तोडले आहेत. आंतरराष्‍ट्रीय ऑलिंपिक समितीने दोन देशांतील खेळाडूंना 2022 पॅरालिंपिक खेळांमध्ये तटस्थ ध्वजाखाली (Neutral Flag) भाग घेण्याची परवानगी दिली होती, परंतु नंतर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

russian gymnast shows Pro-Invasion Symbol on his shirt next to ukrainian winner causes outrage
मोदींची झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटं चर्चा; मदतीसाठी मानले आभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.