Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडच्या हातावर सजली मेहंदी, Photo Viral

ऋतुराज गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२३ ने निरोप घेतला असून आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता क्रिकेट वर्तुळात भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या लग्नाच्या चर्चेने उधाण आलं आहे. ऋतुराज लवकरच उत्कर्षा पवारसोबत सातफेरे घेणार असून सध्या त्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.(Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Mehendi Ceremony Photo)

मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज ३ जून म्हणजे उद्या लग्नबंधनात अडकणार नाहे. त्यापुर्वी त्याच्या लग्नसोहळ्याचा सुरुवात झाली आहे. सध्या त्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडल्याचे दिसत आहे.

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad: ऋतुराजने शेअर केला होणाऱ्या बायकोचा फोटो, सायली म्हणाली, तुम्हा...
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडची बायको दिसते तरी कशी? फोटो व्हायरल

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल २०२३ चा चॅम्पियन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड पहिल्यांदाच त्याच्या त्याची भावी पत्नी उत्कर्षा पवारसोबत दिसला. या दोघांचा एमएस धोनीसोबतचा फोटोही समोर आला होता.

उत्कर्षा ही सुद्धा एक प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा (२३) ही पुण्याची राहणारी आहे. ती महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसोबतच ती वेगवान गोलंदाजही आहे.

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाडच लग्न ठरलं पण...

उत्कर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, ती २०१२-१३ आणि २०१७-१८ च्या हंगामात महाराष्ट्राच्या अंडर-19 संघात सहभागी झाली. तिची महाराष्ट्राच्या सिनियर संघातही निवड झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकवाड आणि उत्कर्षा बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()