Team India : जसप्रीत बुमराहला ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळायचं नव्हतं का?

Jasprit Bumrah
Jasprit Bumrahsakal
Updated on

Team India : जसप्रीत बुमराह जवळपास वर्षभरानंतर मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तो निळ्या जर्सीत दिसला होता, तेव्हापासून तो दुखापतीशी झुंजत आहे. बुमराह आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज बुमराह या महिन्यात आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 टी-20 मालिकेत मैदानात परतणार आहे. तो केवळ मैदानात परतणार नाही, तर संघाचे नेतृत्वही करणार आहे.

Jasprit Bumrah
Smriti Mandhana : 'मी तुझ्यावर प्रेम...' स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडने थेट LIVE कॉन्सर्टमध्ये केलं प्रपोज!रोमँटिक Video व्हायरल

जसप्रीत बुमराह थेट कर्णधार म्हणून मैदानात परतणार आहे. बुमराहला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार बनवल्यानंतर राडा सुरू आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे, तर ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. आयर्लंड मालिकेनंतर लगेचच टीम इंडियाला आशियाई स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत आणि त्यावेळी गायकवाड टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहेत.

Jasprit Bumrah
Smriti Mandhana : 'मी तुझ्यावर प्रेम...' स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडने थेट LIVE कॉन्सर्टमध्ये केलं प्रपोज!रोमँटिक Video व्हायरल

अशा परिस्थितीत गायकवाडला आयर्लंडच्या दौऱ्यापूर्वी कर्णधारपदाचा अनुभव घेण्याची चांगली संधी होती, मात्र निवड समितीने बुमराहला ही संधी दिली, त्यानंतर गदारोळ झाला. गायकवाड यांना आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी कर्णधार म्हणून तयारीची संधी का देण्यात आली नाही, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

Jasprit Bumrah
Team India : आशिया कप आधी 'या' खेळाडूने वाढवले कोच​​-कर्णधाराचे टेन्शन! संघातून होणार हकालपट्टी?

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी गायकवाडला आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपद देण्याची चर्चा केली होती. गायकवाडच्या कर्णधारपदामुळे बुमराहच्या कामाचा ताणही कमी झाला असता, पण वेगवान गोलंदाज बुमराहला कर्णधार बनवायचे होते, असे मानले जाते आहे. बुमराहने यापूर्वी गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.