Ruturaj Gaikwad : स्टुअर्ट ब्रॉड आठवतो का... ऋतुराजचा एका षटकात 7 षटकार मारल्यानंतर शिवा सिंगला संदेश

Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad
Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad esakal
Updated on

Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad : विजय हजारे ट्रॉफी 2022 चा महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र हा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला. महाराष्ट्रचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. त्याने नुकतेच उत्तर प्रदेशच्या शिवा सिंहला एका षटकात 7 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे फायनलमध्ये कर्णधार ऋतुराज काय कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, ऋतुराजने ज्या शिवा सिंहला एकाच षटकात 7 षटकार मारले त्याला एक सुंदर संदेश दिला आहे.

Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad
FIFA World Cup: कतारमधून कडक संदेश! तीन महिला रेफ्रींनी इतिहास रचला

ऋतुराज गायकवाड शिवा सिंहला स्टुअर्ट ब्रॉडची आठवण करून देत म्हणाला की, तुला निराश होण्याची गरज नाही अजून तर संपूर्ण आयुष्य पडलं आहे. स्टुअर्ट ब्रॉडला युवराज सिंगने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये एका षटकात 6 षटकार मारले होते. मात्र त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड हा जगातील एक सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाज झाला. ऋतुराजने शिवा सिंहला यातूनच प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.

Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad
fifa world cup 2022 : स्वतःच्या देशाच्या पराभवाचा आनंद साजरा करणे जिवावर

ऋतुराज गायकवाडने सेमी फायनलमध्ये आसामविरूद्ध 168 धावांची दमदार खेळी करत महाराष्ट्राला अंतिम फेरीत पोहचवले. मात्र ऋतुराज म्हणाला की, क्वार्टर फायनलमधील उत्तर प्रदेशची गोलंदाजी तुलनने अधिक आव्हानात्मक होती. या सामन्यात ऋतुराजने नाबाद 220 धावांची खेळी केली होती.

ऋतुराज स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'मी या सामन्यासाठी फक्त 50 ते 60 टक्केच फिट होतो. तरी देखील मी खेळण्याचा धोका पत्करला. मी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी पूर्ण फिट राहण्याचा प्रयत्न करतोय. तसेच संघातील खेळाडूंसमोर एक उदाहरण ठेवण्याचा देखील प्रयत्न करतोय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.