Ruturaj Gaikwad : ऋतूनं 'प्रिन्स'चं टेन्शन वाढवलं! पहिल्याच टी 20 शतकात विराट, रोहितसह सूर्यालाही मागं टाकलं

Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad esakal
Updated on

Ruturaj Gaikwad T20 Record 1st Century : भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय टी 20 शतक ठोकले. त्याने 57 चेंडूत नाबाद 123 धावा ठोकल्या. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या.

ऋतुराज गायकवाडचे हे शतक विक्रमी देखील ठरले. त्याने पहिल्या 21 चेंडूत 21 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांने 36 चेंडूत 102 धावा ठोकल्या. ऋतुराजने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने दिग्गज खेळाडूंना एकाच शतकी खेळीत मागं टाकलं.

भारतीय संघ 2024 मध्ये टी 20 वर्ल्डकप खेळणार आहे. त्या संघातील सलामीवीराच्या जागेसाठी ऋतुराज गायकवाडनं शतक ठोकत दावेदारी सादर केली आहे. त्यामुळे शुभमन गिलचं टेन्शन वाढलं आहे.

Ruturaj Gaikwad
Gautam Gambhir : द्रविडसाठी वर्ल्डकप जिंकायचा होता; रोहितच्या वक्तव्यावर गंभीर भडकला म्हणाला...

भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • शुभमन गिल - 2023 न्यूझीलंड - नाबाद 126 धावा

  • ऋतुराज गायकवाड - 2023 ऑस्ट्रेलिया - नाबाद 123 धावा

  • विराट कोहली - 2021 अफगाणिस्तान - नाबाद 122 धावा

  • रोहित शर्मा - 2023 श्रीलंका - 118 धावा

  • सूर्यकुमार यादव - 2022 इंग्लंड - 117 धावा

Ruturaj Gaikwad
T20 World Cup : आफ्रिकेतील 'या' संघाला मिळाला अमेरिकेचा व्हिसा! टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी ठरला पात्र

भारताकडून सर्वाधिक टी 20 शतके

  • रोहित शर्मा - 4 शतके

  • सूर्यकुमार यादव - 3 शतके

  • केएल राहुल - 2 शतके

  • सुरेश रैना - 1 शतक

  • विराट कोहली - 1 शतक

  • दीपक हुड्डा - 1 शतक

  • शुभमन गिल - 1 शतक

  • यशस्वी जैसवाल - 1 शतक

  • ऋतुराज गायकवाड - 1 शतक

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.