MS Dhoni : धोनीने आपला फलंदाजीचा क्रमांक संघासाठी नाही सोडला तर... गंभीरच्या वक्तव्यावर श्रीनाथ काय म्हणाला?

MS Dhoni S Sreesanth
MS Dhoni S Sreesanthesakal
Updated on

MS Dhoni S Sreesanth : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीनाथ तसेही वादग्रस्तच काय तर कोणतेही वक्तव्य करण्यापासून लांबच राहतो. मात्र आता त्याने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं. त्याने गौतम गंभीरने धोनीबद्दल केलेल्या वक्तव्यापेक्षा वेगळी भुमिका मांडत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

एस श्रीनाथ म्हणाला की, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपला फलंदाजीचा क्रमांक हा संघासाठी सोडला नाही तर हा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. त्याला त्याची मॅच फिनिशरचे कौशल्य पूर्णपणे वापरता येईल यासाठी हा निर्णय घेतला गेला होता.

MS Dhoni S Sreesanth
ICC Ranking : भारताने कांगारूंना मात देत रचला इतिहास; तीनही फॉरमॅटमध्ये एक नंबर!

गौतम गंभीर धोनीबद्दल वक्तव्य करताना म्हणाला होता, जर धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असता तर त्याने नक्कीच यापेक्षा जास्त धावा केल्या असत्या. हाच मुद्दा स्पोर्ट्सकीडाशी बोलताना श्रीनाथने पुढे नेला.

तो म्हणाला, 'गंभीरने नुकतेच धोनी जर तिसऱ्या क्रमांकावर खेळला असता तर त्याने अजून जास्त धावा केल्या असत्या असं वक्तव्य केलं. मात्र धोनीसाठी जास्त धावांपेक्षा जास्त विजय फार महत्वाचे होते. त्याच्याकडे संघाला गरज असताना सामना फिनिश करण्याची क्षमता होती. त्याने दोन वर्ल्डकप जिंकले आहेत.'

श्रीनाथ पुढे म्हणला की, 'याचं श्रेय धोनीला जातं. मात्र त्याने आपला फलंदाजीच्या क्रमांकाचा त्याग केला नाही. त्याने कोणत्या क्रमांकावर कोणता खेळाडू हा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकतो याच्यावर बरंच काम केलं. त्यानंतर त्या खेळाडूला त्याच क्रमांकावर फलंदाजी करू दिली. त्याच्याकडे संघातील खेळाडूकडून त्याची सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्याचा नेतृत्व गुण होता. त्याने कायम संघाचा पहिल्यांदा विचार केला.'

MS Dhoni S Sreesanth
IND vs AUS : दमदार सलामीनंतर सूर्याही तळपला; भारताने कांगारूंना दिली मात

यापूर्वी स्टार स्पोट्सशी बोलताना गंभीर म्हणाला होता की, 'एमएस धोनी हा भारताचा पहिला विकेटकिपर होता जो आपल्या फलंदाजीने सामन्याचं चित्र पालटू शकत होता. यापूर्वीचे विकेटकिपर हे आधी विकेटकिपर आणि नंतर फलंदाज होते.'

'भारतीय क्रिकेटला एमएस धोनीच्या रूपाने एक आशीर्वादच मिळाला. तो असा विकेटकिपर होता जो तुम्हाला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामना जिंकून देत होता. कारण त्याच्याकडे तो पॉवर गेम होता. धोनी तिसऱ्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकला असता. मला खात्री आहे की त्याने नक्कीच वनडेमध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.