South Africa Vs Australia Semi Final Live World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा 3 विकेट्स राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचे 213 धावांचे आव्हान 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅविस हेडने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर दक्षिण अफ्रिकेकडून तबरेज शम्सी आणि जेराल्ड कॉट्झीने प्रत्येकी 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला चांगलाच घाम फोडला.
ऑस्ट्रेलियाला देखील हे 213 धावांचे माफक आव्हान पार करताना अडचणी आल्या. दमदार सुरूवातीनंतर कांगारूंची अवस्था 5 बाद 134 धावा अशी झाली होती. मात्र स्मिथ (30), जॉश इंग्लिस (28), मिचेल स्टार्क (16) अन् कमिन्सने (14) यांनी अफ्रिकेची कडवी झुंज मोडून काढत अंतिम सामन्याचं तिकिट फिक्स केलं.
जेराल्ड कॉट्झीने स्मिथनंतर 28 धावा करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या जॉश इंग्लिसला देखील बाद करत ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढवले. कॉट्झी बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 धावांची गरज होती.
ऑस्ट्रेलियाची पडझड सुरू असताना एका बाजूने स्टिव्ह स्मिथ झुंजार खेळी करत होता. त्याने 62 चेंडूत 30 धावा केल्या होत्या. मात्र जेराल्ड कॉट्झीने त्याला डिकॉककरवी झेलबाद करत सामन्याचं पारडं पुन्हा एकदा समान केलं.
तबरेज शम्सीने मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेलची शिकार करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 140 धावा अशी केली. यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली.
डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅविस हेड यांनी 6 षटकात 60 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने धक्के देण्यास सुरूवात केली. सर्वात प्रथम डेव्हिड वॉर्नरला मारक्रमला 29 धावांवर बाद केलं. त्यानंतर आलेला शॉन मार्श भोपळाही न फोडता रबाडाची शिकार झाला. यानंतर ट्रॅविस हेडने अर्धशतकी खेळी करत स्मिथच्या साथीने संघाचे शतक 14 व्या षटकात धावफलकावर लावले. मात्र त्याचाही महाराजने 62 धावांवर बाद करत कांगारूंना तिसरा आणि मोठा धक्का दिला.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅविस हेड यांनी दक्षिण अफ्रिकेच्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. या दोघांनी 6 षटकात 60 धावांपर्यंत मजल मारून दिली.
संपूर्ण संघ आल्या पावली माघारी फिरत असताना एकटा डेव्हिड मिलर कांगारूंच्या गोलंदाजांना भिडला. त्याने 116 चेंडूत 101 धावा करत शतक ठोकले. मात्र तो शतकानंतर लगेचच बाद झाला. अखेर अफ्रिकेचा डाव 212 धावात संपुष्टात आला.
डेव्हिड मिलर आपल्या शकताच्या जवळ पोहचला असतानाच केशव महाराज 4 धावा करून बाद झाला. महाराज बाद झाला त्यावेळी अफ्रिकेच्या 191 धावा झाल्या होत्या.
दक्षिण अफ्रिकेचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना एका बाजूने डेव्हिड मिलरने झुंजार खेळी करत संघाला 45 षटकात 182 धावांवर पोहचवले आहे. तो सध्या 109 चेंडूत 88 धावा करून नाबाद आहे.
हेन्री क्लासेन आणि डेव्हिड मिलरने अफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी ट्रॅविस हेडने फोडली. त्याने क्लासेनला 47 धावांवर त्या पाठोपाठ मार्को यान्सेनला बाद करत अफ्रिकेची अवस्था 4 बाद 119 वरून 6 बाद 119 अशी केली.
पाऊस थांबल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने आपला डाव 4 बाद 44 धावांपुढे सुरू केला. डेव्हिड मिलरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत अफ्रिकेला अर्धशतकी मजल मारून दिली. त्याला हेन्री क्लासेन देखील चांगली साथ देत होता.
दक्षिण अफ्रिकेची ऑस्ट्रेलियाने 14 षटकात 4 बाद 44 धावा अशी अवस्था केली असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवावा लागला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पहिल्या 15 षटकातच दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. हेजलवूडने दुसेनला 6 धावांवर बाद करत अफ्रिकेला चौथा धक्का दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेची तिसरी विकेट 22 धावांवर पडली आहे. एडन मार्कराम 20 चेंडूत 10 धावा करून आऊट झाला. मिचेल स्टार्कने त्याला झेलबाद केले.
बावुमानंतर डी कॉकही चाहत्यांचे मन तोडले आहे. सहाव्या षटकात आठ धावांवर दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का बसला आहे. क्विंटन डी कॉकला हेझलवूड झेलबाद केले. त्याला 14 चेंडूत तीन धावा करता आल्या.
६ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या २ गड्यांच्या मोबदल्यात ८ धावा केल्या आहेत.
पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. मिचेल स्टार्कने कर्णधार टेंबा बावुमाला आऊट केले आहे. बावुमाला खातेही उघडता आले नाही. एका षटकानंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या एका विकेटवर एक धाव आहे. सध्या क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन क्रीजवर आहेत.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बावुमाने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. लुंगी एनगिडीच्या जागी तबरेज शम्सीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने दोन बदल केले आहेत. मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अॅबॉट यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे. गेल्या सामन्यात या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.