SA Vs IND : पदार्पणातच साई सुदर्शनचे अर्धशतक, भारताने आफ्रिकेचा 8 विकेट्स राखून केला पराभव

SA Vs IND
SA Vs INDesakal
Updated on

South Africa Vs India : भारताने पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे 117 धावांचे आव्हान 17 व्या षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत विजय मिळवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

आपला पदार्पणाचा सामना खेळणारा सलामीवीर साई सुदर्शनने नाबाद 55 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 52 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने 5 तर आवेश खानने 4 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पण त्याचा संघ आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करू शकला नाही. आणि 28 व्या षटकात 116 धावांवर सर्वबाद झाला. आता भारतीय संघाला पहिला वनडे जिंकण्यासाठी केवळ 117 धावा कराव्या लागणार आहेत. जोहान्सबर्गमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

111-2 : साई सुदर्शनचे पदार्पणात अर्धशतक

साई सुदर्शनने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले. त्याला साथ देणाऱ्या श्रेयस अय्यरने देखील 52 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी रचली. मात्र 52 धावा करून अय्यर बाद झाला.

56-1 (9.3 Ov) : भारताचे अर्धशतक 

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचे 10 व्या षटकात अर्धशतक धावफलकावर लावले.

23-1  : भारताला पहिला धक्का

भारताचा सलामीवीर ऋुतराज गायकवाड 5 धावांवर बाद झाला. त्याल वियान मुलरने बाद केले. दुसऱ्या बाजूने पदार्पण करणरा साई सुदर्शन सेट झाला असून त्याने 13 चेंडूत 16 धावा केल्या आहेत.

अर्शदीप सिंगचा पंजा, आवेश खानचा चौकार! दक्षिण आफ्रिकेचा 116 धावांवर खेळ खल्लास

101-8 (25 Ov) : फेहलुकवायोने करून दिली शंभरी पार 

फेहलुकवायोने नाबाद 33 धावांची झुंजार खेळी करत संघाला शतक पार करून दिले. त्याने बर्गरसोबत 33 धावांची भागीदारी रचली. मात्र अर्शदीप सिंगने फेहलुकवायोचा अडसर दूर केला अन् आपला पाचवा बळी टिपला.

RSA 88/8 (21.5) : फेहलुकवायोची झुंज

दक्षिण आफ्रिकेचे आठ फलंदाज 73 धावात गारद झाल्यानंतर एंडिले फेहलुकवायोने तळातील फलंदाजांना हाताशी धरून पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने 24 धावा करत आफ्रिकेला 90 धावांपर्यंत पोहचवले.

SA Vs IND 1st ODI Live : अर्शदीप सिंग अन् आवेश खानचा आफ्रिकेत डंका! दोघांनी घेतल्या 4-4 विकेट

दक्षिण आफ्रिकेला 17व्या षटकात 73 धावांवर आठवा धक्का बसला आहे. आवेश खानने डेव्हिड मिलरनंतर केशव महाराजला आऊट केले. आणि सामन्यात चौथी विकेट घेतली. अर्शदीप सिंगनेही चार विकेट घेतल्या आहेत. सध्या नांद्रे बर्जर आणि अँडिले फेहलुकवायो क्रीजवर आहेत.

दक्षिण आफ्रिकेत उडाली खळबळ! अर्शदीपने मारला विकेटचा 'चौकार' तर आवेश खानने 2 चेंडूंत दिले 2 धक्के

५२ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अर्शदीप सिंगने चार विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी 11व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 11 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा आहे. सध्या डेव्हिड मिलर आणि फेहलुकवायो क्रीजवर आहेत.

SA Vs IND 1st ODI Live : पॉवर-प्लेमध्ये भारताचा बोलबाला! अर्शदीप सिंगने मारला विकेटचा 'चौकार'

अर्शदीप सिंगने आणखी एक विकेट घेतली आहे. त्याने 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेनरिक क्लासेनला बोल्ड केले. अर्शदीप सिंगने घातक गोलंदाजी करताना चार विकेट घेतल्या आहेत.

SA Vs IND 1st ODI Live : अर्शदीप सिंगने द.आफ्रिकेला दिला तिसरा धक्का!

आठव्या षटकात 42 धावांवर दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. या सामन्यात अर्शदीपने तिसरी विकेट घेतली. त्याने टोनी डी जॉर्जीला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले.

तत्पूर्वी, अर्शदीपने दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूंवर रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

आठ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा आहे. सध्या कर्णधार मार्कराम आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर आहेत.

अर्शदीप सिंगचा कहर...! दुसऱ्या षटकात द.आफ्रिकेचे मोडले कंबरडे

3 च्या धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दोन मोठे धक्के बसले. अर्शदीपने सलग दोन चेंडूंवर हेंड्रिक्स-डुसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली. सध्या कर्णधार मार्कराम आणि डी जॉर्जिया क्रीजवर आहेत.

SA Vs IND 1st ODI Live : क्लीन बोल्ड...! दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगने द.आफ्रिकेला दिला मोठा धक्का

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. अर्शदीपने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. हेंड्रिक्सला खातेही उघडता आले नाही.

SA Vs IND 1st ODI Live : दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरूवात! टीम इंडिया विकेटच्या शोधात

दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स आणि डी जॉर्जी ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भारताकडून गोलंदाजीची सुरुवात करत आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जोर्जी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, विआन मुल्डर, नांद्रे बर्गर, केशव महाराज, तबरेझ शम्सी.

SA Vs IND 1st ODI Live : दक्षिण आफ्रिकेने जिंकली नाणेफेक! भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात घेतला हा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्करामने सांगितले की, नांद्रे बर्जर वनडेमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार राहुलनेही वनडे संघात बरेच बदल केले आहेत.

त्याचबरोबर भारतीय कर्णधार राहुलनेही वर्ल्ड कपपासून एकदिवसीय संघात बरेच बदल केले आहेत. साई सुदर्शन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. सुदर्शनने आयपीएलमध्ये खूप प्रभावित केले होते. तो ऋतुराजसोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. रिंकू सिंग संधी दिली नाही, संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.