SA vs IND 1st Test : संघाला मोठा धक्का! पहिल्याच दिवशी कर्णधार जखमी; आज खेळण्यावर सस्पेंस

SA vs IND 1st Test : संघाला मोठा धक्का! पहिल्याच दिवशी कर्णधार जखमी; आज खेळण्यावर सस्पेंस
Updated on

SA vs IND 1st Test कागिसो रबाडाच्या भेदक माऱ्यापुढे इतर सर्व फलंदाजांची त्रेधा उडत असताना के. एल. राहुलने मात्र जशास जसे उत्तर देत शानदार अर्धशतक केले. त्यामुळे ६ बाद १२१ अशा संकटात सापडलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय येईपर्यंत ८ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारता आली.

SA vs IND 1st Test : संघाला मोठा धक्का! पहिल्याच दिवशी कर्णधार जखमी; आज खेळण्यावर सस्पेंस
KL Rahul : खेळ राहुल, रबाडा अन् पावसाचा... केएलच्या 70 धावा येणार पंतच्या मुळावर?

दरम्यान पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. यजमान संघाचा कर्णधार टेंबा बावुमा सामन्याच्या पहिल्या दिवशी जखमी झाला. या सामन्यात त्याचे पुढे खेळणेही संशयास्पद आहे. बावुमाच्या जागी विआन मुल्डर मैदानात उतरला.

सेंच्युरियनमधील मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला डाव्या हाताच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. या सामन्यात तो पुढे खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. भारताच्या डावाच्या 20व्या षटकात बावुमा जखमी झाला.

क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) नुसार, 'स्कॅन्सवरून असे दिसून आले आहे की टेंबा बावुमाच्या डाव्या पायाला ताण आला आहे. त्याने पुढे खेळायचं का नाही हे डॉक्टर पाहत आहे. बावुमाच्या जागी डीन एल्गरने कार्यकारी कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली. या मालिकेनंतर एल्गरने निवृत्ती जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.