Sa Vs Ind 2nd Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; भारताकडे 36 धावांची आघाडी

South Africa Vs India 2nd Test News :
Sa Vs Ind 2nd Test : पहिल्या दिवसाचा खेळ संपला; भारताकडे 36 धावांची आघाडी
Updated on

South Africa Vs India 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तीन डाव, 270 धावा अन् तब्बल 23 विकेट्स पडल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेचा डाव 55 धावात संपुष्टात आणल्यानंतर भारताचा पहिला डाव देखील 153 धावात संपला. तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा आफ्रिकेच्या फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरूवात केली. त्यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत आफ्रिकेची दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा अशी अवस्था केली होती. अजूनही भारतीय संघाकडे 36 धावांची आघाडी आहे.

तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावात संपवला. मात्र पहिल्या दिवशीच भारताचा देखील पहिला डाव 153 धावात संपुष्टात आला. विशेष म्हणजे भारतीय संघाने तिसरे सत्र सुरू होईपर्यंत 4 बाद 153 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर एन्गिडी आणि रबाडाने दोन षटकातच होत्याचं नव्हतं केलं. या दोघांनी एकही धाव न देता भारताचे पाच फलंदाज तंबूत पाठवले. सिराज शुन्यावर धावबाद झाला. भारताकडून तब्बल सात फलंदाजांना भोपळाही न फोडता आला नाही.

RSA 55 & 62/3 (17)  : दिवसाचा खेळ संपला. 

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 62 धावा केल्या. यजमान संघ अजून 36 धावांनी पिछाडीवर आहे. आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 55 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 153 धावा केल्या.

मुकेशची दुसरी शिकार 

मुकेश कुमारने एल्गरनंतर जॉर्जीला देखील बाद करत आफ्रिकेला दुसरा धक्का दिला.

37/1 (11) : मुकेश कुमारने एल्गरची घेतली विकेट 

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने बिनबाद 37 धावा करून चांगली सुरूवात केली होती. मात्र मुकेश कुमारने कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या डीन एल्गरला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिलं.

RSA 55 & 33/0 (9) : आफ्रिकेची दुसऱ्या डावात चांगली सुरूवात

पहिला डाव 55 धावात गुंडाळला गेल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावात मात्र चांगली सुरूवात केली.

153-10 (34.5 Ov) भारतीय संघाची तिसऱ्या सत्रात ऐतिहासिक घसरण

भारतीय संघाचा देखील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच पहिला डाव संपुष्टात आला. एन्गिडीने भारताला एकाच षटकात तीन धक्के दिले. तर रबाडाने दोन विकेट्स घेत भारतीय संघाची अवस्था 4 बाद 153 धावांवरून सर्वबाद 153 धावा अशी केली.

153-5 (33.1 Ov) : भारत 150 पार मात्र बसला पाचवा धक्का 

पहिल्या दिवशाच्या तिसऱ्या सत्रात भारताने आपल्या पहिल्या डावात 150 धावांचा टप्पा पार केला. विराट कोहली अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे मात्र केएल राहुल 8 धावा करून बाद झाला.

111-4 (24 Ov) : चहापानासाठी खेळ थांबला

भारताने पहिल्या दिवशाच्या दुसऱ्या सत्रात 4 विकेट्स गमावून 111 धावा केल्या आहेत. विराट कोहली 20 तर केएल राहुल 0 धावा करून नाबाद आहेत.

110-4 : श्रेयस अय्यर शुन्यावर बाद 

गिल बाद झाल्यानंतर आलेला श्रेयस अय्यर 2 चेंडू खेळून माघारी फिरला. त्याला नांद्रे बर्गरने बाद केले. बर्गरची ही आतापर्यंतची तिसरी शिकार होती.

भारताला तिसरा धक्का 

रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र नांद्रे बर्गरने गिलला 36 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

 72-2  : रोहितचे अर्धशतक हुकले, विराटने धुरा घेतली खांद्यावर

आक्रमक शैलीत फलंदाजी करणारा रोहित शर्मा 50 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. भारतीय संघाने 18 व्या षटकात 96 धावांपर्यंत मजल मारली.

58-1 (10.3 Ov) : रोहित शर्माची दमदार फलंदाजी 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत भारताला 10 षटकातच 55 धावांचा टप्पा पार करून दिला. आता भारताने पहिल्या डावात आघाडी घेण्यास सुरूवात केली आहे.

17-1 : रबाडाने भारताला दिला पहिला धक्का 

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावात गारद केल्यानंतर भारताने आपला पहिला डाव आक्रमकरित्या सुरू केला. रोहित शर्माने सकारात्मक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र कगिसो रबाडाने भारताला पहिला धक्का दिलाच. त्याने यशस्वी जयस्वालला शुन्यावर बाद केलं.

Sa Vs Ind 2nd Test Live : मोहम्मद सिराजचा 'विकेट'चा षटकार! दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर ऑलआऊट

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -

Sa VS Ind : मियाँ का मॅजिक! सिराजसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या; 55 धावांवर खेळ खल्लास

Sa Vs Ind 2nd Test Live : मोहम्मद सिराजचा विकेटचा षटकार! 50 आत दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का

मोहम्मद सिराजने काइल वेरेयनला आऊट करून विकेटचा षटकार मारला आहे. 18व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने व्हेरेयनला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. वेरेनने 30 चेंडूत 15 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या सात विकेट्सवर 45 धावा आहे.

Sa Vs Ind 2nd Test Live : मियाँ का मॅजिक अन् विकेटचा पंजा!  

दक्षिण आफ्रिकेला 34 धावांवर सहावा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने 16व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड बेडिंगहॅमला आणि पाचव्या चेंडूवर मार्को जॅनसेन आऊट करत आफ्रिकेला सहावा धक्का दिला. यासोबत मोहम्मद सिराजने विकेटचा पंजा घेतला.

Sa Vs Ind 2nd Test Live : सिराज अन् बुमराहचा कहर! दक्षिण आफ्रिकेला चौथा मोठा धक्का

या सामन्यातील पहिल्या 10 षटकात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचा कहर पाहिला मिळाला. मोहम्मद सिराजने एडन मार्करामला (2) बाद करून यजमानांना पहिला धक्का दिला. त्यानंतर सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सिराजने मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार डीन एल्गरला क्लीन बोल्ड केले. एल्गरला 15 चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. मग जसप्रीत बुमराह कुठे मागे राहणार होता. त्याने ट्रिस्टन स्टब्स 11 चेंडूत तीन धावा करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने जॉर्जीला आऊट करत दक्षिण आफ्रिकेला चौथा मोठा धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या आता 4 विकेटवर 15 धावा आहे.

Sa Vs Ind 2nd Test Live : 'मियाँ मॅजिक'! सामन्याच्या तिसऱ्याच षटकात आफ्रिकेला दिला मोठा धक्का

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का एडन मार्करामच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यशस्वी जैस्वालने मोहम्मद सिराजला स्लिपमध्ये झेलबाद केले. मार्करामने 10 चेंडूत दोन धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने एका विकेटवर पाच धावा केल्या आहेत. डीन एल्गर आणि टोनी डी जिओर्जी क्रीजवर आहेत.

Sa Vs Ind 2nd Test Live : कसोटी सामन्याचा रंगला थरार! कर्णधार डीन एल्गरच्या शेवटच्या खेळीला सुरूवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराह भारतासाठी पहिले षटक टाकत आहे. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गर आणि एडन मार्कराम डावाची सुरुवात करत आहेत.

Sa Vs Ind 2nd Test Live : दक्षिण आफ्रिकेने जिंकली नाणेफेक! कर्णधार रोहितने संघात केलं दोन मोठे बदल

डीन एल्गर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दोन बदल केले आहेत. रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा आला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी मुकेश कुमारला संघात स्थान मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.