SA vs IND 2nd Test: दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ही जोड गोळी सर्वांच्या निशाण्यावर आलीये. या दोघात तिसराही येण्याची शक्यता आहे. ते नाव दुसरं तिसंर कोणी नसून युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये तो (Rishabh Pant) नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरताना दिसतोय. पंतने 13 कसोटी सामन्यात 38.25 च्या सरासरीनं 765 धावा केल्या आहेत. तो पुजाराच्या लायनीतच आहे. अनेक मोक्याच्या क्षणी त्याने घोर निराशा केलीये. रिषभ पंतला संधी मागून संधी चालून येतीये पण त्याच सोनं करण्यात तो अपयशी ठरतोय.
पंतची (Rishabh Pant)ज्या वेळी चर्चा केली जाते त्यावेळी तो आक्रमक आहे. त्याची खेळण्याची शैली तिच आहे. आपण ती स्वीकारायला हवी. त्याचा नैसर्गिक खेळात अडथळे आणू नयेत, अशा अनेक कमेंट्स पास करुन अनेक जण त्याचा बचाव करण्यासाठी धावताना दिसते. जर एखादा खेळाडू सातत्याने अपयशी ठरत असेल तर कुठल्यातरी एका खेळीच्या जोरावर वारंवार त्याच्यावर विश्वास टाकणं हे अयोग्यच आहे. त्यामुळे पंतसंदर्भातही संघ व्यवस्थापनाला कठोर भूमिका घ्यावी लागेल. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे सामन्यात पंतच्या नावाऐवजी बुमराहला उप कॅप्टन्सीची दिलेली संधी ही एक संकेतच होते. पंतने ही गोष्ट समजून घेऊन मोक्याला चौकार मारण्याची आवश्यकता आहे.
पंतने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला होता. त्याच्या खेळीच्या जोरावरच टीम इंडियाने इतिहासही रचला. ही कामगिरी त्याला सारखे सारखे वाचवू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो. 2021 मध्ये अहमदाबाद कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी साकारली होती. त्यानंतर जवळपास 12 डावात त्याने केवळ एक अर्धशतक झळकावण्यात यश मिळाले आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर त्याने अर्धशतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये तो सातत्य टिकवू शकलेला नाही. वृद्धिमान साहा अजूनही टीम इंडियाच्या बरोबर आहे. त्याच्याशिवाय केएस भरत, संजू सॅमसन ईशान किशन ही मंडळी लाईनमध्ये उभी आहेत. त्यामुळे पंतला खेळावर अधिक फोकस द्यावा लागणार हे निश्चित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.