Sa vs Ind 2nd Test : केपटाऊन मधील 'या' रेकॉर्डमुळे कर्णधार रोहित सोबतच कोच द्रविडही टेन्शनमध्ये

South Africa vs India 2nd Test News
South Africa vs India 2nd Test News sakal
Updated on

South Africa vs India 2nd Test News : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊन येथे खेळला जात आहे. हा सामना 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधायची आहे.

पण, केपटाऊनमधील भारतीय संघाची आकडेवारी खूपच भीतीदायक आहे. होय, टीम इंडियाला आजपर्यंत या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही... केपटाऊनमध्ये कसे आहेत विक्रम पाहूया...

South Africa vs India 2nd Test News
Aus vs Pak Test : शेवटच्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा! दिग्गज खेळाडूला मिळणार अखेरचा निरोप

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 6 सामने झाले आहेत. भारतीय संघाला यापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याचबरोबर आफ्रिकन संघाने 4 सामने जिंकले असून 2 सामने अनिर्णित राहिले. हे आकडे खरोखरच वाईट आहेत.

पण, रोहित शर्मा आणि कंपनी हा आकडा सुधारण्याच्या आणि या मैदानावर विजयाची नोंद करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 1993 मध्ये केपटाऊनमध्ये 2-6 जानेवारी दरम्यान खेळला गेला होता, जो अनिर्णित राहिला होता.

South Africa vs India 2nd Test News
Ind vs Sa 2nd Test : केपटाऊन टेस्ट सामन्यातून दोन गोलंदाजांचा पत्ता कट, कर्णधार रोहित कोणाला देणार संधी?

सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक हरल्यानंतर भारताने आधी फलंदाजी करताना केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले, तरीही टीम इंडिया 245 धावांवर ऑलआऊट झाली.

त्याचवेळी, दुसऱ्या डावात भारत केवळ 131 धावांवरच करू शकला. अशा प्रकारे भारताला पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

आता दुसरा सामना केपटाऊनमध्ये होणार आहे. जिथे जिंकून टीम इंडियाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. पण, 13 वर्षांपूर्वी एमएस धोनीने मालिका बरोबरी करण्याचे काम केले होते. त्यानंतर असे कधीच घडले नाही. आता रोहित शर्मा भारतात पुनरागमन करू शकतो की नाही हे पाहायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.