पंत शॉट सिलेक्शनमध्ये पुन्हा चुकला; द्रविड गुरुजी घेणार शाळा!

Rishabh Pant
Rishabh Pant AFP
Updated on
Summary

काहीवेळा फलंदाजाला परिस्थितीनुसार आपल्या खेळीत बदल करावा लागतो.

SA vs IND : जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात टीम इंडियाला सात विकेट्सनी पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेनं कर्णधार डेन एल्गरच्या दमदार खेळीच्या जोरावर 240 धावांचे लक्ष्य चौथ्या दिवशीच पार केले. या पराभवातून सावरुन केपटाउनमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील असेल.

भारतीय संघाच्या (Team India) पराभवानंतर आता पुन्हा एकदा खेळाडुंच्या चुकांकडे लक्ष वेधले आहे. यात रिषभ पंत (Rishabh Pant) सर्वांच्या निशाण्यावर आलाय. दुसऱ्या डावात पंतला खातेही उघडता आले नव्हती. मैदानात उतरल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पंत रबाडाच्या (Rabada) गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्याच्या शॉट सिलेक्शनवर राहुल द्रविडही (Rahul Dravid) नाराज आहेत. यासंदर्भात राहुल द्रविडनं मोठ वक्तव्य केले आहे.

Rishabh Pant
RSA vs IND : कॅप्टनचा 'एल्गार'; टीम इंडियाच्या जहाजाशी बरोबरी!

रिषभ पंतची (Rishabh Pant) शैलीही आक्रमक आहे. आम्हाला त्याच्या शैलीवर काहीच आक्षेप नाही. पण शॉट सिलेक्शनमध्ये (Cricket Shot Selection) त्याच्याकडून चुका होत आहेत. आक्रमक रुप धारण करण्यापूर्वी मैदानात स्थिरावण्याचा प्रयत्न त्याने करायला हवा. काळानुसार त्याला या गोष्टी कळतील आणि तो आपल्या कामगिरीत सुधारणा करेल, असा विश्वास द्रविडनं व्यक्त केलाय.

Rishabh Pant
RSA vs IND : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच कारण...

प्रत्येक वेळी आक्रमण करणे हे योग्य नाही. काहीवेळा फलंदाजाला परिस्थितीनुसार आपल्या खेळीत बदल करावा लागतो. यासंदर्भात पंतशी चर्चा करणार आहे, असेही द्रविडनं म्हटलंय. याचा अर्थ आता द्रविड पंतची शाळा घेणार हे निश्चित. यातून इनपूट मिळेल आणि भारतीय संघाला त्याचा केपटाउन कसोटीत (Cape Town) फायदा होईल असे मानायला हरकत नाही.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आणि मॅच विनिंग खेळी करण्याची क्षमता असणारा रिषभ पंत (Rishabh Pant) दोन्ही डावात फेल ठरला. पहिल्या डावात त्याने 17 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. भारतीय संघ बिकट परिस्थितीत असताना रबाडाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. तिसऱ्या चेंडूवरच त्याने हा आक्रमक फटका खेळला. तो काहीकाळ मैदानात थांबला असता आणि डावाला आकार देण्याच्या इराद्याने शैली बदलून खेळला असता तर भारतीय संघाला त्याचचा निश्चितच फायदा झाला असता. त्याची ढिसाळ फलंदाजी टीम इंडियाच्या पराभवामागचं एक कारणच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.