केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा (South Africa vs India, 3rd Test) आणि अखेरचा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानात रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिली मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये (Newlands, Cape Town) रंगणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना ज्या न्यूलँड्सच्या मैदानात रंगणार आहे त्या मैदानातील टीम इंडियाचे रेकॉर्ड काही ग्रेट नाही. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या मैदानावर एकमेव कसोटी खेळलाय. यात दोन डावांत 16.50 च्या सरासरीने त्याला केवळ 33 धावा करता आल्या आहेत. सध्याच्या घडीला संघर्ष करत असलेला चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) अवस्थाही कोहलीपेक्षा वाईट आहे. त्याने या मैदानात दोन कसोटी सामने खेळले आहेत. यात तीन डावांत त्याने 10.66 च्या सरासरीने अवघ्या 32 धावा केल्या आहेत.
या दोघांच्या तुलनेत अश्विनची (ravichandran ashwin) कामगिरी चांगली दिसतेय. रविचंद्रन अश्विनने या मैदाना जो एकमेव सामना खेळ्यात त्यात दोन डावात त्याने 24.50 च्या सरासरीने 49 धावा काढल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी या मैदानात विजय मिळवणं सहज शक्य नाही.
सध्या संघात असलेल्या खेळाडूंची केपटाऊनमधील कामगिरी
रविचंद्रन अश्विन- 1 कसोटी 49 धावा
विराट कोहली- 1 कसोटी 33 धावा
चेतेश्वर पुजारा - 2 कसोटी 32 धावा
केपटाऊनच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावे आहे. त्याने या मैदानात 4 कसोटीत 489 धावा कुटल्या आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) 2 कसोटी सामन्यात 165 तर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) 3 कसोटीत 126 धावा केल्या आहेत. माजी कर्णधार अझरुद्दीनही (Mohammad Azharuddin) या मैदानात दोन कसोटी सामने खेळलाय. त्याने 124 धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.