भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. लोकेश राहुलच्या (Lokesh Rahul) नेतृत्वाखाली व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलमधील मोजक्या सामन्यातील धमाकेदार खेळीनं टीम इंडियाची दरवाजे खुले झालेल्या अय्यरसाठी दक्षिण आफ्रिका दौरा एक सुवर्ण संधीच आहे. संघातील स्थान पक्के करुन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) तो गोत्यात आणू शकतो. दक्षिण आफ्रिका दौरा गाजवण्यासाठी या नव्या हिरोनं खास प्लॅन तयार केला आहे.
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर तो प्रकाश झोतात आला. त्याने न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तो वनडेत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 27 वर्षीय व्यंकटेश अय्यर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात तगडी कामगिरी करण्यात सक्षम आहे. सध्याच्या घडीला त्याच्याकडे हार्दिक पांड्याची परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणून पाहिला जात आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी केलेली खास तयारीसंदर्भात मनमोकळ्या गप्पा मारल्या.
तो म्हणाला की, मालिकेनुसार प्लॅन आखतो. प्रत्येक मॅच वेगळी असते. त्यानुसार एका एका मॅचवर फोकस करण्यावर अधिक भर देतो. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर कशी कामगिरी करायची याबद्दल डोक्यात सतत काही ना काही सुरु आहे. या खेळपट्टीवर चेंडू उसळतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तीन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देण्यासाठी जे काही करायचे आहे त्या गोष्टीवर भर देत आहे. प्रॅक्टिस सेशमध्ये बऱ्याच गोष्टीवर काम करायला मिळते. त्या गोष्टी मैदानात साध्य करण्याचा प्रयत्न करेन. संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही भूमिका खंबीरपणे पार पाडायच्या आहेत, असेही त्याने बालून दाखवले.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात व्यंकटेश अय्यरला स्थान मिळेल, अशी शक्यता आहे. आयपीएलमधील कामगिरीनंतर त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत लक्षवेधी खेळ करुन दाखवला आहे. परदेशी खेळपट्टीवर त्याच्यासाठी आपल्यातील अष्टपैलूत्व सिद्ध करण्याची मोठी कसोटी असली. जर तो या कसोटीत पास झाला तर हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या गोष्टीचा पांड्याला फटका बसला तरी भारतीय संघ निश्चितच फायद्यात असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.