SA vs IND: शमी ठरतोय कपिल पाजींपेक्षाही भारी; पाहा आकडेवारी

mohammed shami
mohammed shami Twitter
Updated on

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात पहिला दिवस लोकेश राहुलनं फलंदाजीनं गाजवला. ज्यावेळी तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलिंगला सुरुवात झाली त्यावेळी मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीत धार दाखवून दिली. मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) पाच विकेट्स घेत एक खास विक्रमाची नोंद आपल्या नावे केली. त्याने कसोटीत 200 विकेट्सचा टप्पा पार केला. भारतीय संघाकडून हा पल्ला गाठणारा तो ऑलओव्हर 11 वा गोलंदाज ठरलाय.

मोहम्मद शमीने 55 व्या कसोटी सामन्यात हा पल्ला सर केलाय. आतापर्यंत त्याने 6 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. 56 धावा खर्च करून 6 विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. भारताचा जलदगती गोलंदाज शमीचं टेस्टमध्ये स्ट्राइक रेट 49.4 आहे. यात 200 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सर्वांपेक्षा आघाडीवर आहे. स्ट्राइक रेटनुसार तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरतो. भारतीय संघाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांनी कसोटीत 434 विकेट घेतल्या आहेत. मात्र त्यांचे स्ट्राइक रेट 63.9 इतके आहे. स्ट्राइक रेटच्या बाबतीत शमी त्यांनाही भारी पडतो.

mohammed shami
SA vs IND मयांक स्वस्तात आटोपला; शार्दुल झाला नाईट वॉचमन!

मोहम्मद शमी कसोटीत सर्वात कमी चेंडूत 200 विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. त्याने यासाठी 9896 चेंडू टाकले आहेत. यापूर्वी अश्विनने 10,248 चेंडू टाकल्यानंतर हा टप्पा पार केला होता. कपिल देव यांनी हा पल्ला पार करण्यासाठी 11,066 चेंडू टाकले होते. रवींद्र जाडेजाने 11,989 चेंडू फेकल्यानंतर 200 विकेट्स मिळवल्या होत्या. सर्वात कमी सामन्यात 200 कसोटी विकेट घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज आहे. कपिल देव यांनी 50 सामन्यात तर जवागल श्रीनाथने 54 सामन्यात 200 विकेट्सचा टप्पा पार केला होता.

mohammed shami
सेंच्युरियनवर पंतची 'सेंच्युरी'; जे धोनीला जमलं नाही ते करुन दाखवलं

मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात 130 धावांची आघाडी घेतली आहे. शमीनं पहिल्या डावात मार्करम आणि कीगेन पीटेरसन यांना अनुक्रमे 13 आणि 15 धावांवर बोल्ड केले. त्याच्याशिवाय मल्डर (12), रबाडा (25) यांच्यासह दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक 52 धावा करणाऱ्या टेम्बा बवुमालाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला. शमीशिवाय बुमराह आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली तर सिराजला 1 विकेट मिळाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.