SA20 2024 Final : काव्या मारनच्या फ्रँचायझीने परदेशात फडकावला झेंडा! दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

सनरायझर्स संघाने सामना जिंकला किंवा हरला असो संघाची मालकीण काव्या मारन नेहमीच चर्चेत असते...
Kavya Maran pumped as Sunrisers Eastern Cape lift trophy marathi news
Kavya Maran pumped as Sunrisers Eastern Cape lift trophy marathi newssaka
Updated on

Kavya Maran pumped as Sunrisers Eastern Cape lift trophy : दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचा अंतिम सामना शनिवारी रात्री सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. विजेतेपदाच्या लढतीत सनरायझर्सने सुपर जायंट्सचा 89 धावांनी पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. सनरायझर्स संघ सलग दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचा चॅम्पियन बनला आहे. संघाची मालकीण काव्या मारनने फायनलमध्ये सनरायझर्सच्या शानदार विजयावर आनंद व्यक्त केला.

Kavya Maran pumped as Sunrisers Eastern Cape lift trophy marathi news
Ranji Trophy : 0, 0, 16, 8, 9, 1... कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद; आकडेवारीने उडाली खळबळ

सनरायझर्स संघाने सामना जिंकला किंवा हरला असो संघाची मालकीण काव्या मारन नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चेंडूवर प्रतिक्रिया देणाऱ्या काव्याच्या संघाने सलग दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका टी-20 लीगचे जेतेपद पटकावले तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Kavya Maran pumped as Sunrisers Eastern Cape lift trophy marathi news
Ranji Trophy : 0, 0, 16, 8, 9, 1... कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद; आकडेवारीने उडाली खळबळ

विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक सनरायझर्स जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सनरायझर्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाला पहिला धक्का डेव्हिड मलानच्या अवघ्या 15 धावांच्या रूपाने बसला.

यानंतर सनरायझर्सच्या डावाची धुरा टॉम बेल (55 धावा) आणि जॉर्डन (42 धावा) यांनी संभाळली, आणि तुफानी फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोन फलंदाजांनंतर संघाचा कर्णधार एडन मार्कराम (42 धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (56 धावा) यांनीही तुफानी फलंदाजी केली आणि त्यांच्या वेगवान फलंदाजीमुळे सनरायझर्सने 20 षटकात 3 गडी गमावून 204 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

यानंतर संपूर्ण स्पर्धेत आपल्या स्फोटक फलंदाजीने चर्चेत राहिलेल्या डर्बनच्या फलंदाजांनी अंतिम सामन्यात नाराज केले. क्विंटन डी कॉक 03, जेजे स्मट्स 01, भानुका राजपक्षे 00 आणि हेनरिक क्लासेन 00 धावांवर बाद झाले. विआन मुल्डर 38 आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी 28 धावांची खेळी खेळली, पण या दोघांनाही पराभवाचे अंतर कमी करता आले. पॉवरप्लेमध्येच सनरायझर्सच्या गोलंदाजांनी आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता. पहिल्या 6 षटकात डरबन संघाने केवळ 27 धावा केल्या आणि तीन विकेट गमावल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()