Sachin Tendulkar 50th Birthday : महान सचिन तेंडुलकरचे महान वर्ल्ड रेकॉर्ड्स एका क्लिकवर

Sachin Tendulkar 50th Birthday
Sachin Tendulkar 50th Birthday esakal
Updated on

Sachin Tendulkar 50th Birthday : क्रिकेट हा जर भारतीय लोकांचा एक धर्म असेल तर त्या धर्माचा लाडका देव म्हणून नक्कीच सचिन तेंडुलकरचेच नाव घेता येईल. सचिन तेंडुलकरने आपल्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या खेळाने एक नाही दोन नाही तर तब्बल एक पिढी आपली फॅन करून ठेवली आहे. तब्बल दोन दशके क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे हसतमुखाने वाहिल्यानंतर सचिन निवृत्त झाला. त्याच्या निवृत्तीबरोबर अनेक चाहत्यांनी देखील टीव्हीसमोर तासंतास बसून सामना पाहण्यातून निवृत्ती घेतली. असा हा लाडक्या तेंडल्या आज (24 एप्रिल) 50 वर्षांचा होत आहे. या निमित्ताने त्याने आंतराष्ट्रीय स्तरावर केलेल्या काही मोठ्या विक्रमांची उजळणी आज करूयात!

Sachin Tendulkar 50th Birthday
Maharashtra Din : सचिन तेंडुलकर : गल्ली क्रिकेटमधला पोऱ्या कसा बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा देव ?

कारकिर्दीत सर्वाधिक कसोटी सामने

सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.

सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकरने कसोटीत 15 हाजर 921 धावा केल्या आहेत. त्याच्या इतक्या कसोटी धावा अजूनतरी कोणी केलेल्या नाहीत.

सर्वाधिक शतके

कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 51 शतके ठोकली आहेत. तसेच 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रमही सचिनने केलाय.

कारकिर्दीत सर्वाधिक 90 धावा

सचिन तेंडुलकर हा सर्वाधिकवेळा नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला आहे. तो कसोटीत 10 वेळा 90 धावांवर बाद झाला.

सर्वाधिक चौकार

कसोटीत सर्वाधिक चौकार मारण्यात सचिन सर्वात अग्रेसर आहे. त्याने 2 हजार 58 चौकार मारले आहेत.

सर्वात वेगवान 15000 कसोटी धावा

सचिन तेंडुलकरच्या नावार कसोटीत सर्वात वेगवान 15000 कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम आहे.

5000 धावा आणि 50 झेल

कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 50 झेल घेणारा सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.

दहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी

सचिन तेंडुलकरने कसोटीत दहाव्या विकेटसाठी 133 धावांची सर्वात मोठी भागीदारी रचली होती.

सर्वात मोठी क्रिकेट कारकिर्द

सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर 22 वर्षे 91 दिवस कसोटी क्रिकेट खेळला. क्रिकेट इतिहासात इतकी मोठी कारकीर्द दुसऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूची नाही.

Sachin Tendulkar 50th Birthday
Sachin tendulkar birthday : ‘मारुती ८००’ मधून वाढदिवसाचा प्रवास

एका कॅलेंडर वर्षाच सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने 1998 मध्ये 1894 धावा ठोकल्या होत्या.

एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त शतके

सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये 9 वनडे शतके ठोकली होती. एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त वनडे शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.

सर्वाधिक अर्धशतके

सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये 145 अर्धशतके ठोकली आहेत. क्रिकेट इतिहासात इतकी वनडे अर्धशतके ठोकणे अजून तरी कोणाला जमलेले नाही.

सर्वाधिक सामने

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक सामने (664) खेळले आहेत.

सर्वाधिक सलग सामने

सचिनच्या नावावर सर्वाधिक सलग सामने खेळण्याचा विक्रम देखील आहे. त्याने 239 सलग सामने खेळले होते.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके

सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()