Sachin Tendulkar : नंबर 1 चं स्थान पटकावणं एका रात्रीत होत नाही; तेंडुलकरने केली संघाची पाठराखण

Sachin Tendulkar Back Indian Cricket Team After Failing In T20 World Cup 2022
Sachin Tendulkar Back Indian Cricket Team After Failing In T20 World Cup 2022 ESAKAL
Updated on

Sachin Tendulkar : भारतीय संघ टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून तब्बल 10 विकेट्सने पराभूत झाला. भारताचे आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आले. भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीत फेल झाला. यानंतर भारतीय संघावर चाहत्यांसकट माझी क्रिकेटपटूंनी देखील सडकून टीका करण्यास सुरूवात केली आहे. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय संघाची आणि खेळाडूंची पाठराखण केली आहे.

सचिन तेंडुलकर भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर म्हणाला की, 'मला माहिती आहे की सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरूद्ध आपली कामगिरी फारच निराशाजनक झाली हे मान्य करूयात. आपण इंग्लंडसमोर चांगली धावसंख्या उभारी नाही. एकही विकेट न पडता 170 धावा चेस करणं हा निराशाजनक पराभव आहे.'

सचिन एएनआयच्या व्हिडिओत पुढे म्हणतो की, ' आपण टी 20 मध्ये अव्वल स्थानावर आहे. अव्वल स्थानावर पोहचणे हे एका रात्रीत होत नाही. आपल्या संघाचे वर्ल्डकपमधील कामगिरीवरून मुल्यमापन करू नका, खेळाडू देखील पराभूत होण्यासाठी खेळत नाहीत. खेळात चढ उतार हे असतातच. आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे.'

भारतीय संघ इंग्लंडकडून हरल्यानंतर सचिन तेंडुलकरने लगेचच एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तो म्हणतो की, 'नाण्याला दोन बाजू असतात. तशा अयुष्यालाही दोन बाजू असतात. जर आपण आपल्या संघाचे यश आपल यश असल्यासारखं साजरं करत असू तर आपण संघाचा पराभव देखील त्याच पद्धतीने घेतला पाहिजे. आयुष्यात यश आणि अपयश दोन्ही हातात हात घालून चालत असतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.