भारतीय संघाजाच जलदगती गोलंदाज एस श्रीसंतने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर श्रीसंत प्रकाशझोतात आलाय. क्रिकेटच्या देवानेही त्याच्यासंदर्भात खास गोष्ट शेअर करत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 2011 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकर आणि एस श्रीसंत भारतीय संघाचा भाग होते.
श्रीसंतसाठी मास्टर ब्लास्टरने इंस्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केलीये. यात लिहिलंय की, कायमच तुझ्याकडे क्षमता असलेला प्रतिभावंत गोलंदाज म्हणून पाहिले. अनेक वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना तू क्षमता दाखवून दिलीस. दुसऱ्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. आयपीएल 2013 मध्ये कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे श्रीसंतच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियरला ब्रेक लागला. त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई झाली. 2020 मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) लोकपाल आयोगाने त्याच्यावरील आजीवन बंदी हटवली. श्रीसंतने केरळ संघातून देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅकही केले. यंदाच्या हंगामात तो रणजी सामन्यासाठीही मैदानात उतरला होता.
आयपीएलच्या मेगा लिलावात श्रीसंतने 50 लाख रुपये मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. पण कोणत्याही फ्रँचायझीन त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. त्याच्या नावापुढे अनसोल्डही लागले नाही.
श्रीसंतची कारकिर्द
एस. श्रीसंत 2007 मध्ये टी-20 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. 2007 च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये श्रीसंतने मिस्बाह उल हकचा जबरदस्त झेल घेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने 27 टेस्ट, 53 वनडे आणि 10 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना 87, 75 आणि सात विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.