Arjun Tendulkar : मला आठवतंय माझ्या वडिलांना….; अर्जुनच्या शतकावर सचिनने दिली पहिली प्रतिक्रिया
Sachin Tendulkar On Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं. गोव्याकडून खेळताना 23 वर्षीय अर्जुनने राजस्थानविरुद्ध 120 धावा केल्या. अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर यांनी 1988 मध्ये रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिननेही पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. मुंबईसाठी संधी न मिळाल्याने अर्जुनने गोव्यासाठी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अर्जुनच्या पहिल्या शतकानंतर सचिनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अर्जुनच्या शतकावर सचिन काय म्हणाला?
क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांमध्ये गणला जाणारा सचिन तेंडुलकर आपल्या वडिलांशी संबंधित एक किस्सा सांगताना एका कार्यक्रमात म्हणाला की, 'तुम्ही हा प्रश्न विचारला हे बरे झाले. मला आठवतंय की, माझ्या वडिलांना मी कोणालातरी सांगताना ऐकले होते, ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी भारतासाठी खेळायला सुरुवात केली होती. तेव्हा कोणीतरी त्यांची ओळख 'सचिनचे वडील' म्हणून करून दिली होती.
पुढे बोलताना सचिन म्हणाला- त्यांनी ते एकून घेतले आणि मग माझ्या वडिलांच्या मित्राने त्यांना विचारले, "तुम्हाला कसे वाटते?" तेव्हा त्यांनी सांगितले की - हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक वडिलांना वाटतं की आपण आपल्या मुलांच्या कामगीरीने ओळखले जावे.
सचिन तेंडुलकरने मान्य केले की त्याचा मुलगा असल्याने अर्जुनवर अतिरिक्त दबाव येतो. तसेच सचिन खेळत असे तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. यासोबतच त्याने सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर अर्जुनशी काय बोलणे झाले ते देखील सांगितले. त्यावेळी अर्जुन क्रीजवर नाबाद होता.
सचिन म्हणाला, 'मी त्याला शतक करण्याबद्दल सांगितले. तो नाबाद 4 धावांवर फलंदाजी करत होता, त्याला नाईटवॉचमन म्हणून पाठवण्यात आले होते.' त्याने विचारले, 'तुम्हाला काय वाटते चांगली टोटल काय असेल?' ते 210/5 होते. मी म्हणालो, 'किमान 375 गाठायचे आहे'. तो म्हणाला, 'तुम्हाला खात्री आहे का?' मी उत्तर दिले, 'हो'. यासोबतच अर्जुनला सांगितलं की, तू शतक करू शकतोस यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे सचिन म्हणाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.