सूर्यकुमार यादवच्या 'या' गगनभेदी षटकारांचा सचिनही बनला चाहता

सूर्यकुमार यादवच्या या षटकारांनी सचिन तेंडुलकरलाही बनवले फॅन ट्विटरवर मिळाले भरपूर प्रेम
Eng vs Ind Suryakumar Yadav
Eng vs Ind Suryakumar Yadavsakal
Updated on

Eng vs Ind Suryakumar Yadav: इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडने भारतावर 17 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतरही टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने 55 चेंडूत 117 धावा केल्या. जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत टीम इंडिया हा सामना जिंकेल असे वाटत होते. संपूर्ण जग सूर्यकुमारचे कौतुक करत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कसा मागे राहील. सूर्यकुमार यादवच्या या खेळीवर सचिनने त्याच्या कौतुकात करत एक ट्विट केले आहे. सचिनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

Eng vs Ind Suryakumar Yadav
सूर्यकुमार यादवने ठोकले धमाकेदार शतक, रोहित-रैनाच्या यादीत समावेश

सचिन तेंडुलकरने ट्विट करताना लिहिले की, सूर्यकुमार यादव हे उत्तम शतक आहे. संपूर्ण डावात जोरदार फटकेबाजी केले, पण ओव्हर द पॉइंटवरून जो षटकार मारलाना तो अति उत्तम होता. सूर्यकुमारने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 198 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादव वगळता इतर एकही फलंदाज टिकू शकला नाही.

Eng vs Ind Suryakumar Yadav
९० वर्षांपूर्वी साडी नेसणाऱ्या पोरीने विम्बल्डनमध्ये भारताचं नाव गाजवलेलं..

सूर्यकुमार व्यतिरिक्त भारताकडून सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने 28 धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही प्रत्येकी 11 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने हा सामना गमावला असला तरी मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 जुलैपासून दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.