Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमच्या इतिहासात एजून एक सोनेरी पान जोडले जाणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लाईफ - साईज स्टॅचूचे आज वानखेडे स्टडियममवर अनावरण होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआय सचिव जय शहा, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि स्वतः सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांसोबतच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक आणि इतर सदस्य देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती पीटीआने दिली आहे.
सचिन तेंडुलकरचा लाईफ साईज पुतळा हा त्याचा आयकॉनिक शॉट खेळतानाचा असणार आहे. हा पुतळा सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळ बसवण्यात येणार आहे. हा पुतळा आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी तयार केला आहे. ते मुळचे अहमनगर जिल्ह्यातील आहेत.
सचिन तेंडुलकरने बरोबर 10 वर्षापूर्वी आपल्या मुंबईमधील होम ग्राऊंडवर, वानखेडेवर शेवटचा सामना खेळला होता. आज त्याच्या वानखेडे स्टेडियमवरील पुतळ्याचे अनावरण करण्याचा मुहूर्त साधला जाणार आहे. यापूर्वी सचिन हा आपल्या 50 व्या वाढदिवसादिवशी पुतळ्याचे अनावरण करेल असे सांगितले होते. मात्र पुतळ्याला अजून फिनिशिंग टच देण्यात आला नव्हता. त्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली.
आता जवळपास सहा महिन्यांनी सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अखेर अनावरण होणार आहे. सचिन तेंडुलकरने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 15,921 धावा करत वनडेमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपली वनडे कारकीर्द ही वर्ल्डकप जिंकल्यानंतर काही दिवसांनी संपवली होती.
सचिन तेंडुलकरचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न हे तब्बल सहा वर्ल्डकप खेळण्यानंतर 2011 मध्ये पूर्ण झाले. सचिनचे होम ग्राऊंड वानखेडेवर भारताने श्रीलंकेचा अंतिम सामन्यात पराभव करत वर्ल्डकप उंचावला होता. त्यानंतर विराट कोहली आणि युसूफ पठाणने सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेत जल्लोष केला होता. सचिनच्या पुतळ्याचे आज अनावरण झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकपमधील आपला श्रीलंकेविरूद्धचा सामना खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.