Har Ghar Tiranga: सचिन तेंडुलकरने आपल्या घरी फडकावला तिरंगा, म्हणाला- माझ्या हृदयात...

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात सामील
Har Ghar Tiranga sachin tendulkar
Har Ghar Tiranga sachin tendulkar sakal
Updated on

Har Ghar Tiranga : भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण करण्यासाठी अमृत महोत्सव साजरा करत आहे. यानिमित्ताने नरेंद्र मोदी सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व देशवासी आपापल्या घरी तिरंगा लावत आहेत. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात सामील झाला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या घरी तिरंगा फडकवला आहे.

Har Ghar Tiranga sachin tendulkar
Asia Cup 2022: आशिया चषक जिंकणारे भारतीय कर्णधार

सचिनने ट्विटरवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो घराच्या बाल्कनीत तिरंगा लावताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत सचिन म्हणाला, तिरंगा नेहमीच माझ्या हृदयात आहे, आज मी माझ्या घरीही तिरंगा फडकावणार आहे. पुढे तिरंगा लावत सचिन तेंडुलकर म्हणतो, 'हृदयात तिरंगा, घराघरात तिरंगा, जय हिंद.'

भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणारा सचिन तेंडुलकर हा एकमेव भारतीय खेळाडू नाही. इरफान पठाणसह इतर खेळाडूंनीही पोस्ट शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका कौटुंबिक समारंभात पारंपारिक पगडी घातलेला दिसला होता. सचिनने आपल्या भाचीच्या लग्नात ही पगडी घातली होती, ज्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. सचिन तेंडुलकर भारतासाठी एकूण सहा वर्ल्डकपमध्ये भाग घेतला होता. 2011 चा विश्वचषक सचिनसाठी खूप संस्मरणीय होता, जिथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.