Sachin Tendulkar : मी जे काही पाहिलं त्यावरून भारतीय संघानं... सचिन तेंडुलकरने टीम इंडियाचे कान उपटले

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar esakal
Updated on

Sachin Tendulkar : भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेतील पहिला कसोटी सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावला. भारतीय संघाला दोन्ही डावात चांगली फलंदाजी करता आली नाही. पहिल्या डावात केएल राहुलच्या शतकामुळं भारताने 245 धावांपर्यंत मजल मारली. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ 131 धावात गारद झाला.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात 408 धावांचा डोंगर उभारला. डीन एल्गरने 185 धावांची दमदार खेळी करत दोन फलंदाजांसोबत शतकी भागीदारी रचली.

Sachin Tendulkar
Pakistan Cricket : ड्रेसिंग रूममध्ये झोपला तर याद राखा... पाकिस्तानी क्रिकेटपटूंना PCB ची तंबी

भारताच्या या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडिया कुठं चुकली याचं विश्लेषण केलं. सचिन तेंडुलकरने ट्विट केलं की, 'दक्षिण आफ्रिका चांगली खेळली. पहिल्या डावानंतर दक्षिण आफ्रिका संघ थोडा नाखूश असले असं मला वाटलं होतं. मात्र दुसऱ्या डावात त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी अपेक्षपेक्षा चांगली गोलंदाजी केली. खेळपट्टी सामना जसजसा पुढे सरकेल तसतशी फलंदाजीला पोषक होत होती.'

सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, 'जेवढं मी पाहिलं भारतीय फलंदाजांची फटक्यांची निवड चुकली. संपूर्ण कसोटीत एल्गर जेनसन, बेडिंगहम, विराट कोहली आणि केएल राहुल हे खऱ्या अर्थाने सहजरित्या फलंदाजी करत होते. ते परिस्थितीशी जुळवून घेत योग्य तंत्र वापरत फलंदाजी करत होते.'

Sachin Tendulkar
WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेने एकाच फाईटमध्ये वातावरण केलं टाईट, भारताची झाली मोठी घसरण

दक्षिण आफ्रिकेने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील 33 वर्षाचा कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ यंदा संपवणार असं वाटत होतं. मात्र पहिलाच कसोटी सामना आफ्रिकेने जिंकल्याने मालिका विजयाचे स्वप्न भंगले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.