सचिन तेंडुलकरने निवृत्तीनंतर विराटनं दिलेलं गिफ्ट का केले परत?

Sachin Tendulkar returned special gift given by Virat Kohli
Sachin Tendulkar returned special gift given by Virat Kohli esakal
Updated on

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने वेस्ट इंडीजविरूद्ध कारकिर्दितला शेवटचा सामना खेळला होता. सचिन तेंडुलकर निवृत्त झाला त्यावेळी आता त्याची जागा कोण घेणार हा यक्ष प्रश्न होता. मात्र खुद्द क्रिकेटच्या देवानेच आपला उत्तराधिकारी म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli) घोषणा केली. मात्र या उत्तराधिकाऱ्याकडून निवृत्तीनंतर मिळालेले खास गिफ्ट परत केले होते.

Sachin Tendulkar returned special gift given by Virat Kohli
रोहित केकेआर कॅप्टन अय्यरला न खेळवण्याबाबत स्पष्टच बोलला

सचिन तेंडुलकर 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. (Sachin Tendulkar Retiremnet) त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. जी पिढी सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहून मोठी झाली होती. त्या पिढीने सचिन तेंडुलकरला भावनिक निरोप दिला. खुद्द क्रिकेटचा देव (God Of Cricket) असलेल्या सचिन तेंडुलकरचे डोळे देखील पाणावले होते. तो ड्रेसिंग रूमध्ये एका कोपऱ्यात तोंडावर टॉवेल टाकून बसला होता. दरम्यान, त्याच्या जवळ त्यावेळी संघात नवखा असलेला विराट कोहली आला आणि त्याने त्याला खास गिफ्ट दिले.

Sachin Tendulkar returned special gift given by Virat Kohli
VIDEO: 'तू कायम मुंबई इंडियन्समध्येच राहशील' असं अर्जुन तेंडुलकरला कोण म्हणालं?

या घटनेबाबत खुद्द सचिन तेंडुलकरने ग्रॅहम बेसिंगरशी बोलताना सांगितले की, 'मी ज्यावेळी तोंडावर टॉवेल टाकून एखा कोपऱ्यात बसलो होतो. त्यावेळी तेथे विराट आला आणि त्याने मला त्याच्या वडिलांनी (Virat Kohli Father) दिलेला एक पवित्र धागा दिला.' सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला की, 'तो धागा मी थोडावेळ आपल्या जवळ ठेवला आणि त्यानंतर तो विराट कोहलीला परत दिला. मी सांगितले की ही मौल्यवान गोष्ट आहे आणि ही तुझ्याजवळच ठेव कोणालाही देऊ नको. ही तुझी संपत्ती आहे आणि ही शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याकडेच राहिली पाहिजे. तो एक भावनिक क्षण होता. हा क्षण माझ्या आठवणीत कायम राहणार आहे.'

Sachin Tendulkar returned special gift given by Virat Kohli
Ranji Trophy: अखेर झुंजार अजिंक्यची बॅट बोललीच; शतकाने सावरला मुंबईचा डाव

सचिन या मुलाखतीत म्हणाला की, मला भारताकडून खेळताना बीसीसीआय (BCCI) किती पैसा देणार आहे हे माहिती नसायंच. तो म्हणाला ज्यावेळी मी 1989 ला पदार्पण केले तेव्हापासून निवृत्त होण्यापर्यंत फक्त धावा करण्याकडेच माझे लक्ष असायचे. सचिन तेंडुलकर वनडे आणि कसोटीत देखील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.