'मी विराटच्या जागी असतो तर...'; वाचा सचिन तेंडुलकर काय म्हणाला

Virat-Sachin
Virat-Sachin
Updated on

विराटने घेतलेल्या निर्णयावर सचिनने मांडलं रोखठोक मत

Ind vs Eng Test: भारतीय संघाने लॉर्ड्सवरील कसोटी सामना १५१ धावांनी जिंकला आणि कसोटी मालिकेत १-०ने आघाडी घेतली. पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी जोडीने तुफान फलंदाजी केली. त्यांनी पहिले सत्र संपेपर्यंत फलंदाजी केली. लंच टाइमनंतरही विराटने ९ चेंडूंचा खेळ झाल्यावर डाव घोषित केला. त्यामागचा नक्की विचार काय असावा असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने यामागचा विचार काय असेल याचा अंदाज वर्तवला आणि तो स्वत: विराटच्या जागी असता तर त्याने काय केले असते, हेदेखील सांगितले.

Virat-Sachin
इंग्लंडच्या स्टार खेळाडूला दुखापत; भारतासाठी ठरला होता डोकेदुखी

"मी विराटच्या जागी असतो तर मी भारतीय फलंदाजीचा डाव लंच टाईमच्या आधीच घोषित केला असता. अगदी नीट सांगायचं तर लंचच्या आधी दोन-तीन षटके शिल्लक असताना मी डाव घोषित केला असता. त्यामागचा विचार असा की लॉर्ड्सचे मैदान खूप मोठे आहे. तेथून ड्रेसिंग रूममध्ये जाण्यासाठी खूप पायऱ्या चढउतार कराव्या लागतात. अशा परिस्थितीत मी त्यांना मुद्दाम दोन षटके बॅटिंग करायला लावली असती आणि मग लंच टाइम घेतले असते. कोणत्याही सलामीवीराला अशा प्रकारे दोन षटके खेळून आत जाणं आवडत नसल्याने त्याचा गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो", असे सचिन म्हणाला.

Virat-Sachin
T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल गंभीरची भविष्यवाणी

"त्याचा आणखी एक उपयोग म्हणजे जर इंग्लंडच्या एखाद्या जोडीला सूर गवसला असता आणि त्यांनी भागीदारी करण्यास सुरूवात केली असती तर गोलंदाजांना तीन-चार षटके जास्त टाकायला मिळाली असती. पण विराटच्या डोक्यातला प्लॅन काही वेगळाच होता. पण परिणाम तोच झाला. दोन्ही सलामीवीर वर स्टेडियममधून फिल्डिंगला आले. नंतर बॅटिंगसाठी पुन्हा तयार व्हायला वर गेले, मग पुन्हा खाली आले. या धावपळीत त्यांना चांगलाच दम लागला आणि दोघेही शून्यावर बाद झाले. विराटने जो प्लॅन डोक्यात ठेवला तोदेखील तितकाच उत्तम होता आणि त्याचा परिणाम सगळ्यांसमोर आहेच", असं सचिन हसतहसत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.